७ जून रोजी पाऊस हजेरी लावत असतो. तेथून पुढे पावसाला सुरुवात होऊन सर्वत्र खरीप पिकाच्या हंगामाला सुरुवात शेतकरी वर्ग करीत असतो. मात्र यावर्षी जून महिना संपत आला असून अजूनही या भागामध्ये दमदार पाऊस झाला नाही. पावसाचे वेळापत्रक बदलल्याने शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या कोणत्या भरवशावर करायच्या हाच प्रश्न निर्माण झाला आहे. तुरळक पावसावर जर खरिपाच्या पेरण्या केल्या आणि पाऊस जर वेळेवर नाही पडला तर दुहेरी पेरणीच्या संकटात शेतकरी वर्ग सापडेल या भावनेने शेतकरी अजूनही खरिपाच्या पेरण्या पासून वंचित राहिला गेला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील इतर मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. आता फक्त पाऊस कधी पडतोय या कडे लक्ष वेधले गेले आहे. दरोरोज दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण असते. मात्र पाऊस काय पडतीचे रूप काय दाखवत नसल्याने या पुढील सर्वच हंगाम पुढे ढकलण्याचे चित्र आहे. एकंदरीत दरवर्षीप्रमाणे पाऊस वेळेत झाला नाही तर शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या उशिरा सुरू कराव्या लागणार हे ही तितकेच सत्य आहे.
खोर (ता. दौंड) परिसरामध्ये पावसाचे आगमन लांबणीवर पडले गेल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या गेल्या आहेत.
(छायाचित्र : रामदास डोंबे, खोर)