लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : अचानक कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकण पंचक्रोशीतील महत्त्वाच्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता खड्ड्यात गेल्याने या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.औद्योगिक पंढरीत महाळुंगे, निघोजे, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, खालुंब्रे, वासुली, शिंदे, वराळे, सावरदरी व आंबेठाण तसेच बिरदवडी परिसरात छोट्या मोठ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर ये-जा करणाºया कामगारांसह जड वाहने आणि अवजड कंटेनरची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु असते. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवतींचीही मोठी वर्दळ सुरु असते.या भागात दिवसरात्र पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी सर्कस करावी लागत आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने याठिकाणी महाविद्यालयीन युवती, प्रवासी आपल्या दुचाकी गाडीवरून खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होत असते. त्यामुळे आपोआपच मोठी वाहतूककोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे.जनावरांनाही चालताना लाज वाटेल, असा हा रस्ता झाला असून, दिवसातून एक तरी लहानमोठा अपघात येथे होत आहे. चाकण तळेगाव महामार्गावरील हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून, रस्ता दुरुस्त करण्याच्या चालढकलपणामुळे येथील नागरिकांसह शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, महाविद्यालयीन युवक, युवती, वाहनचालक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.चाकण आंबेठाण रस्त्याचीही खूप वाईट अवस्था झाली आहे. याही मार्गावर फूटभर खोल खड्डे पडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावर लहान मोठ्या कंपन्या, कारखाने, गोदामे तसेच वाढते नागरिकीकरण असल्याने रस्त्याने जाणाºया नागरिकांना या खड्ड्यांशी रोजच सामना करावा लागतो.या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून, याचा मनस्ताप वाहनचालकांसह येथील नागरिक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पिके गेली वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:35 AM