शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पावसामुळे द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान

By admin | Published: October 04, 2016 1:30 AM

येथे दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या कमीअधिक पावसामुळे डाळिंब आणि द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे व औषधफवारणीसाठी उघडीप

निमगाव केतकी : येथे दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या कमीअधिक पावसामुळे डाळिंब आणि द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे व औषधफवारणीसाठी उघडीप न मिळाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून या भागातील द्राक्ष आणि डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षांच्या पानांवर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर, लहान द्राक्षघड पाणी साचून पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. डाळिंब बागेलासुद्धा कळीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन झाडावरून मोठ्या प्रमाणावर कळीगळती झाली आहे आतापर्यंत फळबागांवर केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाणार, अशी स्थिती निमगाव परिसरामध्ये निर्माण झाली आहे. त्याबरोबरच पुन्हा औषधफवारणी करूनसुद्धा म्हणावा तसा फायदा होणार नाही. बागांमध्ये फूलकळी बाहेर टाकण्याची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे आता या बागा या हंगामापुरत्या तरी सोडून देण्याची वेळ आली आहे. साचून राहिलेल्या पाण्यामुळे झाडांच्या मुळ्या कुजून संपूर्ण बागाच नष्ट होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.