लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राखीपौर्णिमेचे औचित्य साधून राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने बस फेऱ्याच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला.यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. पुणे विभागाने आपल्या १३ आगारप्रमुखांना तशा सूचना देऊन अतिरिक्त बसचे नियोजन करण्यास सांगितले.
पुणे एसटी विभागाने शुक्रवार पासून अतिरिक्त गाडया सोडण्याचे नियोजन केले आहे.यात पुणे - नागपूर, पुणे - सोलापूर, पुणे -कोल्हापूर,पुणे - सातारा, आदी प्रमुख मार्गासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जास्त गाडया सोडण्यात येणार आहे.यात पुणे - दौंड, पुणे - इंदापूर, आदी भागांत गाडया सोडण्यात येणार आहे.
बॉक्स 1
सध्या सुरू असलेल्या बस :
पुणे - सातारा, पुणे - कोल्हापूर, पुणे -ठाणे, पुणे - बोरिवली, पुणे- सोलापूर, पुणे - पंढरपूर, पुणे - फलटण, पुणे- औरंगाबाद, पुणे - बीड , पुणे -नाशिक, पुणे - अहमदनगर,आदी मार्गावर पूर्ण क्षमतेने बस गाडया धावत आहेत.
बॉक्स 2
या मार्गावर वाढणार फेऱ्या :
पुणे - सातारा, पुणे - कोल्हापूर, पुणे -ठाणे, पुणे - बोरिवली, पुणे- सोलापूर, पुणे - पंढरपूर,पुणे - दौंड, पुणे - बारामती, पुणे - इंदापूर आदी मार्गावर फेऱ्याची संख्या वाढणार आहे. टायमिंग गाड्यासह बसेसच्या ३० टक्के अतिरिक्त फेऱ्या होणार आहे.
बॉक्स 3
प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन :
राखीपौर्णिमे निमित्ताने एसटी गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त गाड्याचे नियोजन केले आहे.जवळपास ३० ते ३५ टक्के प्रवासी संख्या वाढेल असा एसटी प्रशासनाचा अंदाज आहे.
-------------------------
राखी पौर्णिमेला होणारी गर्दी लक्षात घेता बस फेऱ्याची संख्या वाढविणार आहोत. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अन्य मार्गावर देखील अतिरिक्त बस सोडले जातील.
- पल्लवी पाटील, स्वारगेट बस स्थानक प्रमुख, पुणे