खोर : सध्या दौंड तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा तसेच पावसाच्या अभावामुळे या परिसरातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ, शेतकºयांनाही पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या परिसरात पडीक शेतीचे प्रमाण वाढले आहे.यामुळे शेतकºयांच्या मालाला नसलेला बाजारभावामुळे दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला असल्याचे सध्या या भागामधील चित्र आहे. यामध्ये दौंड तालुक्यातीलदक्षिण व पश्चिम भाग सर्वस्वी भरडला जात असतो. खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, हिंगणी, जिरेगाव, वासुंदे, रोटी, माळवाडी, नारायणबेट, भांडगाव या गावांचा यामध्ये जास्त जिरायती भाग म्हणून समावेश होतो. मात्र, या गावांना कायमस्वरूपाची पाण्याची उपाय योजना का होत नाही, हा मोठा व गहन प्रश्न सध्या पडत आहे.या गावांची संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून या जिरायती भागामधील गावांची कायमस्वरूपाची पाणीटंचाई संपवून या संदर्भातील आता ठोस पावले आगामी काळात उचलण्याची सध्याच्या स्थितीत गरज भासू लागली आहे. या भागामधील गावांचा दुष्काळ हटविण्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणून योग्य ती अंंमलबजावणी करणे गरजेचे आहे.एकीकडे खडकवासला योजनेच्या पाण्यावरून संघर्ष उपस्थित झाला असून, कालवेदेखील या पाण्याच्या संघषार्मुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खडकवासला धरणसाखळीत पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, हवेली या तालुक्यांतील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती ही आजच्या परिस्थितीत जळून जाण्याच्या मार्गावर आहे.दौंड तालुका हा जलसिंचनाच्या सुविधांंच्या बाबतीत जरी मागे असला, तरी ज्या भागामधून या तालुक्याला पाणी घ्यावे लागते, त्यामध्ये दौंडचा वाटा मोलाचा आहे. आज जनाई-शिरसाई ही पाण्याची योजना चालू आहे, यामध्ये सर्वांत मोठे श्रेय हे दौंड तालुक्याचे आहे. कारण जनाई-शिरसाई योजनेला लागणारे पाणी हे वरवंड (ता. दौंड) येथूनच उचलले जात असून, अशा या हक्काच्या पाण्यासाठीच या तालुक्यावर संघर्ष करण्याची वेळ आली आहे.आपलेच पाणी आपल्यालाच विकत घेण्याची वेळ येत असेल, तर त्यासारखी कठीण व विचार करण्याजोगी दुसरी कोणतीच गोष्ट नसेल. आजची परिस्थितीत पाहिली तर दौंड तालुक्याच्या उशाला दोन सिंचन योजना या कार्यान्वित आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर जलसिंचन उपसा योजना. मात्र, या दोन्ही योजना दौंड तालुक्याला शेतकरीवर्गाने पैसे भरले तरच वरदान ठरत आहेत. सध्या दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामधील शेती ही पाण्याच्या अभावामुळे ९५ टक्के पडीक असून शेतकºयांचे उपजीविकेचे साधन असलेली शेतीच ही पडीक राहिली असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक व उत्पन्नाची साधनेच बंद पडली आहेत.दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्याला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला, जनाई-शिरसाई योजना व पुरंदर योजना या योजनांच्या माध्यमातून दौंड तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी वेळोवेळी विधानसभेत, पाणी मीटिंगमध्ये हा प्रश्न उपस्थितीत केला असून त्यामधील या योजना सध्या दौंड तालुका दुष्काळमुक्तीच्या दिशेने पुढील आगामी काळात वाटचाल करेल, ही अपेक्षा या भागामधील जनता व शेतकरी वर्गाला आहे.
भीषण दुष्काळामुळे दौैंडकरांची पाण्यासाठी पायपीट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:41 AM