महाळुंगे : सध्या चाकण परिसरात डेंग्यू सारख्या महाभयंकर रोगासह इतर मलेरिया, ताप या रोगांची देखील साथ आहे. हे सगळे सुरू असतानादेखील चाकण तळेगाव राज्य महामार्गावरील महाळुंगे गावातील बजाज कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याबरोबरच या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.खाजगी कंपनी, व्यावसायिक व गोदाम मालकांनी कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या परवानगी न घेता राज्यमहामार्गा लगत असणाऱ्या गटारांमध्ये पाणी सोडले आहे. या गटाराचे सांडपाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने हे सांडपाणी सध्या टीसीआय गोडाऊन व बजाज कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर मुख्य रस्त्यावर सोडण्यात आले आहे. यामुळे येथील राहणाºया नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.गटारावर अतिक्रमणे असल्याने गटार पुढे बंद झाले आहे त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे तसेच दुचाकी, कामगारांना व पादचाºयांना याच सांडपाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे येथील रहिवासी, कामगारवर्ग, पादचारी यांना मलेरिया व इतर रोगांची लागण झाल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नाही.नागरिकांना साथीचे आजार झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. गावातील एका युवकाचा स्वाइन फ्लूने मृत्यु झाल्याने आधीच भीतीचे वातावरण आहे.तक्रारीची दखल घ्या...सरपंच कल्पना कांबळे, उपसरपंच विशाल भोसले, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पारासूर, सदस्य काळूराम महाळुंगकर, जयसिंग तुपे, आदींनी दुर्गंधीयुक्त पाण्याची पाहणी करून संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीने संबंधितांना पत्रव्यवहार करून दुर्गंधीयुक्त पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. तसेच जिल्हा आरोग्य विभाग व औद्योगिक विभागाची तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.गटारात सोडलेले पाणी पुढे गटार बंद केल्यामुळे साचत आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. संबंधित प्रशासनाने सांडपाणी वाहण्यास योग्य तो स्रोत काढून द्यावा.- मंगेश मिंडे, व्यावसायिकया सांडपाण्याची योग्य ती विल्लेवाट लावण्यासाठी बांधकाम विभागशी पत्राद्वारे कळवले आहे. या सांडपाण्याची पाहणी करून लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यात येईल.- विशाल भोसले, उपसरपंच
गटाराच्या सांडपाण्यामुळे साथीचे आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 2:01 AM