शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

यवतला शॉर्टसर्किटमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या कंपनीला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 7:29 PM

दौंड तालुक्यातील सहजपुर व नांदूर पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देसदर गोदामात तयार तुप,पुठ्ठे व पॅकेजिंग साहित्ययापुढील काळात या भागात आपत्कालीन सुविधा निर्माण करणे गरजेचे

यवत: नांदूर येथील वैष्णवी देवी डेअरी प्रॉडक्ट लि.कंपनीच्या गोदामाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून गोदामातील मालाचे नुकसान झाले. या आगीत जीवितहानी झालेली नाही. परंतु. कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी ( दि. २२आॅगस्ट) दुपारी कंपनीमधील गोदामाला आग लागल्याचे कामगारांच्या लक्षात आले. यावेळी काही वेळातच गोदामातून धुराचे लोट बाहेर येण्यास सुरुवात झाली. सदर गोदामात तयार तुप,पुठ्ठे व पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले होते. यामुळे थोड्याच वेळात आग वेगात सर्व गोदामात पसरली. मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीच्या प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. हडपसर येथून अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.यवत पोलीस देखील घटनास्थळी आले होते. मात्र आगीते नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू  शकली नव्हती.   दौंड तालुक्यातील सहजपुर व नांदूर पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. सद्य परिस्थितीत सुमारे १८ लहान मोठ्या कंपन्या या भागात सुरू आहेत. लहान एमआयडीसी येथे सुरू झाल्यानंतर कंपन्यांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास आवश्यक सोयीसुविधा मात्र उपलब्ध झालेल्या नाहीत.या भागातील कोठे आग लागल्यास थेट पुण्यातून अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागते.आज घडलेल्या घटनेत आगीने तीव्र स्वरूप धारण केलेले नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु, यापुढील काळात या भागात आपत्कालीन सुविधा निर्माण करणे गरजेचे बनले आहे. अनेक कंपन्या येथे असताना साधी अग्निशामक दलाची व्यवस्था नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो कामगार व आजूबाजूच्या नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलMIDCएमआयडीसी