शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

भुयारी मेट्रोमुळे पेठांमध्ये वाढली धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 3:20 AM

शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरू होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून

पुणे : शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरू होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून, आधुनिक तंत्राचा वापर करून हे काम करण्यात येईल. भुयारी मर्गावर अनेक जुने वाडे, घरे येत असून, भुयारी मार्गाचे काम करताना त्यांना धोका पोहोचू शकतो. तब्बल ३२५ कुटुंबांचे भुयारी मेट्रो मार्गामुळे स्थलांतर करावे लागणार आहे. यामुळे सध्या पेठांमधील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १६ किलोमीटरच्या मार्गामध्ये कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा सुमारे ५.२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जमिनीच्या खाली भुयारी असेल. यामध्ये दोन बोगद्यांमधून येणारी आणि जाणारी अशा दोन मेट्रो धावणार आहेत. या कामासाठी महामेट्रोच्या वतीने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी दिली. या साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्थानके असून, ती जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असतील. मेट्रो स्थानकात प्रामुख्याने शिवाजीनगर, न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट यांचा समावेश आहे. या मेट्रो स्थानकांसाठी प्रत्येकी सरासरी १० मीटरच जागा मेट्रोला लागणार आहे. भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने खोदकाम करताना हादरे बसत नाहीत. भुयारी मार्गामुळे बांधकामांना कोणताही धोका पोहोचणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.भुयारी मेट्रो स्थानकासाठी ३२५ कुटुंबांचे स्थलांतरकृषी महाविद्यालय ते स्वारगेट या साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मेट्रो मार्गावर एकूण पाच भुयारी मेट्रो स्थानके होणार आहेत. या मेट्रो स्थानकांमध्ये मुबलक प्रकाशयोजना, हवा खेळती राहण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीसाठी बाहेर येण्याचा मार्ग, स्थानकांतून बाहेर येण्याचा मार्ग यासाठी जमिनीवर काही व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी ज्या-ज्या ठिकाणी भुयारी मेट्रो स्थानके होणार आहेत, त्या ठिकाणच्या सुमारे ३२५ कटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी दिली.असे होणार भुयारी मार्गाचे काम...

कृषी महाविद्यालय ते स्वारगेटदरम्यान भुयारी मार्गात एक जाण्यासाठी व एक येणाºया मेट्रोसाठी असे दोन टनेल असतील. हे भुयारी मार्ग सुमारे १६ ते २८ मीटर खोल असून, यासाठी अधुनिक ४ टनेलिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे.बोगदा करण्यासाठी कृषी महाविद्यालय आणि स्वारगेट येथे दोन मोठे खड्डे खोदण्यात येणार असून, तेथूनच साडेपाच किलो मीटरचे बोगदे करण्यासाठी आवश्यक असलेल्या टनेलिंग मशिन जमिनीत घालण्यात येणार आहेत. पुण्यात बहुतेक सर्व ठिकाणी बेसॉल्ट खडक असल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचा मेट्रोचा दावा आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर किमान एक वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागेल. 

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे