वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात तीव्र उन्हाळा जाणवत असून तापमान सरासरी ३८ ते ४० डिग्रीसेल्सीअस मध्ये गेल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना फळबागा जगवण्यासाठी सलाईनच्या बाटल्यांनी पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. तर उन्हाच्या तीव्रतेपासून बागांचे रक्षण करण्यासाठी साड्यांच्या सहयाने बागा झाकल्या जात आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या पातळीत घट झाल्याने द्राक्षेच्या बाग व डाळींबाच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सलाईनच्या बाटलीचा तर काही ठिकाणी तांब्याच्या सह्याने पाणी घालण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील डाळींब उत्पादक व द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. इंदापूर तालुक्यात १५ हजार एकरावर डाळींबाची लागवड करण्यात आलेली आहे. तर द्राक्षे लागवडीसाठी १२ ते १३ हजार हेक्टरी लागवड करण्यात तालुका अग्रेसर ठरले आहे. त्यात कळस, बोरी, भरणेवाडी, शेळगाव या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याने डाळींब व द्राक्षे लागवड करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर दिलेला आहे. आर्थिक संकट : कर्जमाफीची मागणी मात्र पाण्याची कमतरता तीव्र उन्हाळ्याच्या झळा यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या बागांना शेवटची घटका मोजण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांच्या पिक कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी डाळींब उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.बाग आणि ठिबकच जळाल्याने शेतकरी पुरूषोत्तम किर्वे हतबल झाले आहेत. डाळिंब बागेला आगीची झळ लागल्याने झाडे व फळे जळून गेली आहेत. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार बी.सी बंडगर यांनी या घटनेचा पंचानामा केला आहे. अधिक तपास बारामती तालुका पोलिस ठाणे करीत आहे. शॉर्ट सर्किटमुळे डाळिंबबाग जळालीबारामती : गोजूबावी (ता. बारामती) येथे विद्युत रोहित्राच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ४ एकर क्षेत्रातील डाळिंबा बाग व ठिबक सिंचनाचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत शेतकरी पुरूषोत्तम शंकर किर्वे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तालुका पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शेतामध्ये असणाऱ्या विद्युत रोहित्रामध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. त्यामध्ये डाळिंब बागेचे तसेच बागेमध्ये असणाऱ्या ठिबक सिंचन संचाचे मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळ्यामुळे फळबागा ‘सलाईन’वर
By admin | Published: March 30, 2017 12:06 AM