दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोच्या बाजारभावात घट झाली तसेच पालेभाज्यांच्या बाजारभावातही घसरण झाली. वांगी, भोपळा, काकडी, टोमॅटो, दोडका यांची आवकेत वाढ झाल्याने बाजारभावात घसरण झाली. तर मिरची, कारली, भेंडी, गवार, दोडका यांचे बाजारभाव स्थिर असून, भुसार मालाच्या आवक कमी होऊन बाजारभाव तेजीत निघाले. लिंबाची आवकेत वाढ झाल्याने बाजारभावात घसरण झाल्याची माहिती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१0 किलोप्रमाणे) - टोमॅटो (५५) २०-५०, वांगी (३४) ६०-१००, दोडका (२०) ७०-१२०, भेंडी (९) ५०-१००, कारली (१७) ७०-१२०, हिरवी मिरची (२९) ३०० ते ६५०, गवार (३) १०० ते ३००, भोपळा (४७) २० ते ५०, काकडी (४८) ३० ते ६०, कोथिंबीर (१०६४० जुड्या) १०० ते ३००, मेथी (६१७0 जुडी) १००-३००. दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (११४) १६५० ते २१००, ज्वारी (१५) १७०० ते २४५१, बाजरी (३०) १४०० ते २०००, लिंबू (२२) ७०० ते ९००.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (४२१) १७३१ ते २२००, ज्वारी (१९५) १७५१, २३००, बाजरी (४६५) १४५१ ते २१०१, हरभरा (५७) ६१०० ते ५८००, मका लाल/पिवळा (१३) १७५१ ते १९००, मूग (४०५) ४७०१ ते ५०५१, लिंबू (११०) ७०० ते १४५०. पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (२१) १५०० ते २०००, ज्वारी (९) १५००-२१५१, बाजरी (८६) १२५१ ते १७००, हरभरा (१) ६००० ते ६०००, यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (२८१) १६१५ ते २१००, ज्वारी (६) १७०० ते १९००, बाजरी (४१) १६०० ते २०००, लिंबू (८३) १००० ते १७००.
टोमॅटोच्या भावात घट
By admin | Published: September 14, 2016 12:51 AM