तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी डायमुख, वरवडी खुर्द, कळकवाडी, शेरताटी, धनावडेवाडी, वरवडी या गावाचा संपर्क तुटला आहे. गेले तीन दिवस मुसळधार पावसाने डोंगरातून येणारे पाणी ओढ्यात न मावल्याने ओढ्या लगतचा परिसर जलमय झाल्याने वरवडी पंचक्रोशीचा संपर्क तूटला आहे. वरवडी खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळील ओढा, वरवडी बुर्दुक, वरवडी डायमुख येथील ओढ्याला पूर आल्याने कामानिमित्त गेलेले कामगार, शेतकरी, मजुर गावा पर्यंत पोहचू शकत नाहीत.
सदर भागातील गावे डोंगराच्या कुशीत वसलेली असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गावकऱ्यांनी सुरक्षीत ठिकाणी जावे असे आवाहन वरवडी खुर्द सरपंच राजेंद्र वरे यांनी केले आहे.
--
२३ भोर तालुका पाऊस
वरवडी खुर्द (ता. भोर) येथील ओढ्याला आलेला पूर.