या बद्दल वनपरीक्षेत्र आधिकारी मुकेश सणस यांनी संबंधितांचे कौतुक केले आहे.
वन परिमंडळ लोणी काळभोरमधील मौजे होळकरवाडी या ठिकाणी चिंकारा प्रजातीचे हरीण हे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जखमी झाल्याचे आढळून आले होते. स्थानिक ग्रामस्थांकडून ही माहिती मिळताच वनरक्षक वाघोली व वनरक्षक वडकी यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन हरणाला ताब्यात घेतले. सदर हरीण हे पुढील उपचारार्थ बावधन येथील रेस्क्यू सेंटर या ठिकाणी हरणावर उपचार केले. या बाबतीत उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक शेंडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वाय. यू. जाधव, वनरक्षक राहुल रासकर, वनरक्षक बळीराम वायकर इत्यादींनी तातडीने हालचाली करत सदर चिंकारा प्रजातीच्या हरणाला जीवनदान दिले. हरीण सुखरूप असून बावधन येथील रेस्क्यू टीम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या वर योग्य ते उपचार करून त्याला निसर्गात सोडण्यात येणार आहे.