पुणे: शहरातील कचरा शहरामध्येच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात कच-यापासून वीजनिर्मितीचे सुमारे २५ प्रकल्प सुरु केले. या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी २.५० कोटीपेक्षा अधिक पैसे खर्च केले जात आहेत. परंतु, कच-यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प केवळ कागदावरच चालू असून, तब्बल १० प्रकल्प पूर्णपणे बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अन्य प्रकल्प ५० टक्के क्षमतेने देखील चालू नाहीत. महापालिका प्रशासनाच्या प्रचंड दुर्लक्षामुळे नागरिकांच्या कराच्या पैशांची अशा उधळपट्टी सुरु आहे...
शहराचा कचरा ग्रामीण हद्दीत येऊ देणार नाही अशी भूमिका पुणे शहराच्या हद्दीलगतच्या भागातील नागरिकांनी घेतली होती. तसेच फुरसुंगी येथील कचरा डेपोवर देखील ओपन डपिंग करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे शहरात निर्माण होणा-या कच-यांची गंभीर समस्या निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने तातडीने तब्बल १६ ते १८ कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात सरासरी ५ टन ओल्या कच-यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प सुरु केले. शहरामध्ये सध्या एकूण २५ कच-यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीबाबत सजग नागरिक मंचाच्या वतीने माहिती अधिकारामध्ये माहिती मागविली असता यामध्ये अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात हडपसर, पेशवे पार्क, कात्रज रेल्वे म्युजियम येथील एकूण ५ प्रकल्प पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे केवळ करार नूतनीकरण न केल्याने ऑक्टोबर २०१५ पासून हे प्रकल्प बंद असल्याचे समोर आले. तर वडगाव, घोले रोड, वानवडी, पेशवे पार्क येथील ५ प्रकल्पात गेल्या वर्षभरात १ ही युनिट वीज निर्मिती झालेली नाही. --------------कच-यापासून वीजनिर्मिती होणा-या प्रकल्पांची सद्य:स्थितीएकूण प्रकल्प : २५पूर्णपणे बंद प्रकल्प : हडपसर १, हडपसर २, पेशवे पार्क १ व २, कात्रज रेल्वे म्युझियम, वडगाव १, वडगाव २, घोलेरोड, वानवडी, पेशवे पार्क- --------------प्रत्येक प्रकल्पामध्ये महिन्याला १५० टन कचरा जिरणे अपेक्षित असताना, वडगाव १ मध्ये ४० %, वडगाव २ मध्ये ३० %, घोले रोड मध्ये ५५ %, धानोरी मध्ये ३० %, पेशवे पार्क २ मध्ये ३५ %, फुलेनगर मध्ये १० %, एव्हड्याच क्षमतेने कचरा जिरवला गेला. ----------------------- कच-यापासून वीजनिर्मितीसाठी सुरु केलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये १० किलो ओल्या कच-यापासून १ घन मीटर गॅस तयार होणे आवश्यक आहे. मात्र कालावधीत या सर्व २० प्रकल्पात पाठवलेल्या कच-यापासून या प्रकल्पांमध्ये फक्त २० % क्षमतेने गॅस निर्मितीचे काम झाले. ----------------------स्वच्छ सर्वेक्षणामध्ये स्वच्छतेचा टक्का यामुळेच घसरलामहापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरामध्ये विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु केले. परंतु प्रकल्प सुरु झाल्यापासून आता पर्यंत एकदाही हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत. तर गेल्या काही वर्षांत यातील अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. यबाबत वेळोवेळी पत्रव्यावहार करून प्रशासनाला जाब विचारला आहे. परंतु अद्यापही यामध्ये काही दुरुस्ती झालेली नाही. प्रशासनाकडून नागरिकांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. याचाच परिणाम केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराच्या स्वच्छतेचा टक्का घसरला.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच