पुणे : सीओईपी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या चौकापासून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आजपासून (गुरूवार दि. ०२) पासून हा मार्ग बंद असेल. या बदलामुळे गुरूवारी सकाळच्या वेळी आॅफिसला जाणार्यांची गर्दी आरटीओलगतच्या चौकात पहायला मिळाली.महापालिकेकडून येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. संचेती हॉस्पिटलकडून तसेच जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने सीओईपी चौकातून आरटीओकडे वाहनांना बंदी असेल. मात्र सीओईपी चौकातून जंगली महाराज रस्त्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत चालणार आहे. पाटील इस्टेटकडून आरटीओकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी उड्डाणपुलावरून संचेती हॉस्पिटलसमोरून न्यायालय येथून शाहीर अमर चौक मार्गाचा वापर करावा. तर सिमला आॅफिसकडून आरटीओकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून न्यायालयासमोरून जाऊ शकतात.दरम्यान हा बदल उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी सिमला आॅफिस चौक, विद्यापीठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. या बदलामुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाच्या कामामुळे सीओईपी चौकाकडून पुणे आरटीओकडील रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:04 PM
सीओईपी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या चौकापासून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आजपासून (गुरूवार दि. ०२) पासून हा मार्ग बंद असेल.
ठळक मुद्देमहापालिकेकडून येथील उड्डाणपुलाचे काम सुरू संध्याकाळच्या वेळी सिमला आॅफिस चौक, विद्यापीठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी