पुणे : तुमच्या पाठिंब्यामुळेच कार्यकर्ते असे धाडस करतात. माझ्यावरही अनेक खटले दाखल केलेले आहेत. मराठी माणसाच्या हितासाठी तुमचा मुलगा लढतो आहे. त्याच्यावरच्या खटल्याच्या खर्चाची काळजी करू नका; पक्ष ते पाहून घेईल, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्ते कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनात दरोड्याचे गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांची ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे तसेच आशिष देवधर, राम बोरकर, सचिन पांगारे, सलीम शेख, तुकाराम काटे, गणेश पाटील आदी १३ कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. माजी नगरसेविका रूपाली पाटील, प्रशांत कनोजिया, सुधीर धावडे हेही या वेळी उपस्थित होते.ठाकरे यांनी सर्वांची विचारपूस केली. ‘तुम्ही कुुटुंबीय कार्यकर्त्यांच्या पाठीशी असता, हे पक्षाचे मोठे बळ आहे. आपल्या मुलाने मराठी माणसाच्या हितासाठी आंदोलन केले आहे, काहीही वाईट केलेले नाही, हे लक्षात घ्या.त्यांच्यावर लावलेले दरोड्याचे कलम मागे घेण्यात येत आहे. त्यासाठी पक्ष प्रयत्न करणार आहे. तुमच्या पाठीशी पक्ष आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत; त्यामुळे काळजी करू नका, असे ठाकरे यांनी त्यांना सांगितले.
तुमच्या पाठबळामुळेच पक्षाला बळ, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:11 AM