शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

कोरोना आणि मधुमेह एक द्वंद्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:09 AM

कोरोना विषाणूच्या साथीसाठी उपाययोजना करताना प्रभावी औषधे (antiviral therapy) लस, साथ पसरू नये याकरता मास्क वापरणे. माणसांमध्ये अंतर ...

कोरोना विषाणूच्या साथीसाठी उपाययोजना करताना प्रभावी औषधे (antiviral therapy) लस, साथ पसरू नये याकरता मास्क वापरणे. माणसांमध्ये अंतर राखणे, स्वच्छता राखणे हे उपाय व्यवहार, ज्ञान व शास्त्राला अनुषंगून आहेत. मात्र कोरोना विषाणूचा शरीरात होणारा प्रवेश, त्याचा शरीरात खोलवर संचार व त्याचा विविध संस्थांचा संहार करण्याची ताकद या गोष्टी metabolic (चयापचय संस्थेशी) निगडित असणे हे त्याचे वैशिष्ट्य!

याच कारणामुळे कोरोना व जगात प्राबल्याने धुमाकूळ घालणारे मधुमेह, स्थूलपणा यांसारखे जगद्वव्यापी आजार यांचे मोठे घनघोर युद्ध आपण बघत आहोत. मधुमेह माणसाची प्रतिकारशक्ती खच्ची करत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास शरीराचे प्रकर्षाने नुकसान होऊ शकते. याचा पुरावा सर्व देशांमध्ये गेल्या दोन वर्षांत आपण पाहात आहोत.

माणसाच्या या महाभयंकर शत्रूंची अनेकविध आघाड्यांवर हात मिळवणी (collusion) झाली आहे. तर इतर बाबींमध्ये त्यांची टक्कर (Colusion) होत आहे.

शरीराच्या अनेक पेशींच्या बाह्य आवरणांवर ACE2 तसेच DPP4 या नावाचे receptor असतात. याचे सामान्य कार्य रक्तदाब, रक्तवाहिन्या लवचिक ठेवणे (ACE2) किंवा रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे (ACE2) किंवा रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे DPP4 असते. कोरोना विषाणूचे Spike Protein या दोन्ही विषारी खास आकर्षण ठेवतो. त्यामुळे कोरोना विषाणू फुप्फुसे, रक्ताभिसरण संस्था, स्वादुपिंड, मूत्रपिंड, मज्जासंस्था अशा विविध जागी शिरकाव करू शकतो. जेवढा मधुमेह तीव्र किंवा अनियंत्रित तेवढा काेरोनाचा मुक्त संचार होऊ शकताे.

१) फुप्फुस - ACE2 द्वारे फुप्फुसाच्या रक्तवाहिन्या व वायुकोशामध्ये काेरोना प्रवेश करू शकतो. फुप्फुसांच्या कार्यात अडथळा (न्यूमोनिया व प्राणवायूची कमतरता) आल्यामुळे सर्व शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. स्थूल/लठ्ठ माणसांच्या फुप्फुसांच्या आकुंचन प्रसरणात जास्त अडथळा / मर्यादा असल्यामुळे ही कमतरता बळावू शकते.

२) हृदय व रक्ताभिसरण संस्था -

मधुमेह म्हणजेच हृदयविकार हे ज्यांना माहीत आहे ते लक्षात घेतील की कोरोना विषाणूमुळे वाढणारा अंतर्गत दाह (Inflammation) काेरोनामुळे शरीरात उसळणा-या दाहक वादळ वावटळीचा (cytokine storm) दुष्परिणाम हृदय व रक्तवाहिन्यांवर होऊ शकतो. Myocarditis (हृदयाचा दाह) रक्त जास्त घट्ट होऊन गाठी होणे (tbrombosis) हे घातक आजार होऊ शकतात.

कोरोना होऊन गेल्यानंतरसुद्धा फुप्फुसे क्षीण रहाते, हृदय अशक्त होणे अथवा हृदयविकाराचा झटका येणे या गुंतागुंती जास्त होऊ शकतात.

३) मूत्रपिंड : मधुमेह व उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजारांचे महत्त्वाचे कारण आहे. काेरोना विषाणू मूत्रपिंडाचे नुकसान करू शकतो. Acute kidney Injury (AKI) व मधुमेही रुग्णांमध्ये जास्त धोकादायक ठरू शकते.

४) मज्जासंस्था : मेंदूच्या रक्तपुरवठ्यात बिघाड, फिट्स येणे, स्मृतीवर दुष्परिणाम हे करोना व मधुमेह या दोघांमुळे होऊ शकतात.

काेरोनामुळे मधुमेहाच्या उपचारांविरोधी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते :

१) संचारबंदी / Lockdown : यामुळे व्यायामशाळा, मैदाने, जलतरण तलाव बंद असल्यामुळे व्यायाम चालू ठेवणे शक्य नसते. त्यामुळे वजन तसेच साखर वाढू शकते.

२) लॉकडाऊन परिस्थितीमध्ये औषधांचा पुरवठा तसेच तसेच glucometer पट्ट्यांचा पुरवठा, इन्सूलिन इंजेक्शन न मिळणे यामुळे अडचण होते.

३) अनेकवेळा ताज्या भाज्या, फळे याऐवजी तळलेले पदार्थ, Junkfood किंवा शीतपेयांचा वापर वाढू शकतो. मधुमेह नियंत्रणाच्या हे विरुद्ध आहे.

४) मधुमेही रुग्ण (विशेषत्वे ज्येष्ठ नागरिक, टाइप १ मधुमेहाची मुळे) डाॅक्टरांकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे साखर नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढतो.

अनेक दवाखाने बंद असल्यामुळे तसेच रुग्णांना इस्पितळात जाण्याची भीती असल्यामुळे डाॅक्टर व रुग्णांच्या भेटी अनियमित होतात.

५) कोरोनामुळे सर्व जगात पसरलेले भीतीचे वातावरण, घरात, शहरात, परिसरात होणारे कोरोनाचे मृत्यू यामुळे Stress प्रचंड वाढला आहे.

६) Social Media किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये सतत घडणा-या कोरोना साथीच्या चर्चा किंवा त्याविषयीचे समज / गैरसमज यामुळे गोंधळाची परिस्थिती उत्पन्न झाली आहे.

कोरोना, मधुमेह व भारत देश :

भारतात सुमारे ७ ते ८ कोटी मधुमेही रुग्ण आहेत. तसेच ७ ते ८ कोटी निदान न झालेले मधुमेही आहेत. मधुमेह धोक्याची पूर्वसूचना देत नाही. मधुमेहाचा शरीरप्रवेश बहुतांशी चोरपावलांनी होतो. कोरोनाच्या निमित्ताने माणसांची रक्तचाचणी होते व साखर वाढल्याचे लक्षात येते. मधुमेहाचे प्रमाण वाढण्याचे सद्यस्थितीत हे महत्त्वाचे कारण आहे. कोरोनाच्या मधुमेहविरोधी वैशिष्ट्यांमुळे रक्तातील साखर वाढू शकते. कोरोना उपचारांदरम्यान जर Steroid चा वापर झाला, तरी साखर वाढू शकते. क्वचितप्रसंगी कोरोना विषाणू स्वादुपिंडावर हल्ला करून नव्याने मधुमेहाचे कारण होऊ शकतो. भारतात कोरोनाच्या लाटेनंतर मधुमेहाची लाट येईल.

आपण काय करणे हितावह?

मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, दोन माणसांमध्ये ६ फुटांचे अंतर राखणे व लस टोचून घेणे या मूलभूत सुरक्षा आहेत.

मधुमेह असल्यास साखर वेळोवेळी तपासून डाॅक्टरांचा (आवश्यक तर) Video सल्ला घेऊन नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेही रुग्णांना कोरोना होण्याची risk इतरांपेक्षा जास्त नाही / नसेल. मात्र काेरोना संसर्ग झाला तर आजाराचे गांभीर्य जास्त राहू शकते. सामान्यत: ८०% कोरोनाबाधित रुग्ण बरे होतात. पण २०% रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो. मधुमेह असल्यास हा त्रास प्रलंबित होण्याची भीती असते. त्यामुळे आहार व नियंत्रणाबाबत दक्षता बाळगणे सुरक्षित.

मधुमेही रुग्णांना लस घेण्यापूर्वी कोणतीही जास्त / विशेष खबरदारी आवश्यक नसते.

काेरोना महामारीतून आपण महत्त्वपूर्ण धडा घ्यावा आणि आरोग्य / स्वास्थ्याविषयी हेळसांड करू नये.

काळी बुरशी (Mucarmycosis) अनियंत्रित मधुमेह असल्यास किंवा steroid चा जास्त वापर झाल्यास होऊ शकतो. यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.