बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचा डमी अर्ज, कुणाचा अर्ज अंतिम?
By नितीन चौधरी | Published: April 18, 2024 12:27 PM2024-04-18T12:27:37+5:302024-04-18T14:14:15+5:30
नेमका कुणाचा अर्ज अंतिम केला जाईल याबाबत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावरच बारामती मतदारसंघातील निवडणूक चित्र बदलण्याची शक्यता आहे....
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतर्फे डमी अर्ज भरला. या मतदारसंघात महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उमेदवार म्हणून निश्चित झाल्या असल्या तरी अजित पवार यांच्या डमी अर्जाने राजकीय चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे नेमका कुणाचा अर्ज अंतिम केला जाईल याबाबत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावरच बारामती मतदारसंघातील निवडणूक चित्र बदलण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून यापूर्वीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी यामुळे ही निवडणूक देशपातळीवर गाजू लागली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) असून सुनेत्रा पवार हे या गुरुवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यासोबतच अजित पवारांनी देखील डमी अर्ज म्हणून दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची काल रात्री उशिरा पुण्यातील एका हॉटेलमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. त्यात अजित पवार हे डमी अर्ज म्हणून दाखल करतील असे ठरले होते. त्यामुळेच अजित पवार यांचा अर्ज डमी म्हणून दाखल केला, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघातील बदललेले चित्र लक्षात घेता अजित पवार यांचा डमी अर्ज हा मुख्य अर्ज म्हणून राहतो की काय हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यानंतर या लोकसभा मतदारसंघातील चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.