पिंपरी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई भरतीची शुक्रवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान बावधन येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी डमी परीक्षार्थी बसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मूळ परीक्षार्थी आणि डमी असे दोघांनाही अटक केली आहे. या बाबत २८ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुनाफ हुसैन बेग (रा. काळेगाव, जालना) आणि प्रकाश रामसिंग धनावत (रा. करमाड, औरंगाबाद) असे अटक आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील अरिहंत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या परीक्षा केंद्रावर मूळ परीक्षार्थी प्रकाश धनावट याच्या जागी मुनाफ बेग हा विद्यार्थी डमी बसला होता. डमी परीक्षार्थीने मूळ उमेदवाराची खोटी सही करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.