ऑनलाइन लोकमतपिंपरी : चार पेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक होत असेल अशा जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केले त्यामुळे आजपासून पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. नगपालिकांची आचारसंहितेचा खोडा महापालिकेतील नवीन प्रकल्पांना बसणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांसाठी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केली. चारपेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक होत आहे. अशा जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली आहे. पुणे जिल्ह्यात १० नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतही आचारसंहिता लागू झाली आहे. ती १५ डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प, महापालिका क्षेत्रातील विकासकामांना खोडा असणार आहे.
सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय नाहीमहापालिकेलाही मतदारांवर प्रभाव पाडता येईल, असा कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेल्या गाड्याही काढूण घेण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेमार्फत मतदारांवर प्रभाव पाडणारा कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. सर्वसाधारण सभेसमोर पंतप्रधान आवास योजना, खेळाडू दत्तक योजना, भक्ती शक्ती येथील दीडशे कोटींचा उड्डाणपुल, विविध प्रभागातील विकासकामे, शहरास हगणदारी मुक्त करण्यासाठी निधीची मंजूरी, कावेरीनगर येथील साडेसहा कोटींचा पूल आदी प्रकल्पांचे विषय मंजूरीसाठी अडचण येणार आहे. तसेच स्थायी समितीसमोर स्थापत्य आणि पाणीपुरठा विषयक प्रकल्पांचे, विविध विकासकामांचे २९ विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांनाही आळा बसणार आहे.
पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेणार?निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या गाड्या ताब्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेत्या, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, विषय समित्यांचे सभापती, शिक्षण मंडळ सभापती व उपसभापती तसेच प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या गाड्यांचा समावेश असणार आहे.
नगरपालिकांची आचारसंहिता महापालिका कार्यक्षेत्रासाठी लागू असणार आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पांना मंजूरी, कामाचे आदेश देता येणार नाही. तसेच मतदारांवर प्रभाव पडणारे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसदर्भात निर्देश आल्यास पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्यात येतील. दिनेश वाघमारे (आयुक्त, महापालिका)
जिल्हयातील नगरपालिकांची निवडणूक आहे. ही महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता आहे, की नाही याबाबची माहिती अद्याप मिळालेली नाही.आचार संहिता लागू झाल्यास धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचण येणार आहे. विकासकामांना आळा बसणार आहे. शकुंतला धराडे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका