पुणो : पर्वती भागातील नंदादीप सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव फुले विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी लंडनस्थित टेरी पॉलिसी या संस्थेद्वारा आयोजित पर्यावरणपूरक निबंध स्पर्धेमध्ये यश मिळविले. प्राजक्ता निवृत्ती टोलमारे व श्रुतिका अनंत खलाटे अशी विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघींनी पाठविलेल्या पर्यावरणावरील आधारीत निबंधास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. नंदादीप एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त इंदुमती लांडगे व टेरी पॉलिसी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांच्याहस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी लांडगे म्हणाल्या, पर्यावरणाचे महत्त्व जगातील प्रत्येक माणसाला लक्षात यायला हवे. आज प्रदूषणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्याला कुठेतरी आळा बसायला हवा. शहरीकरणाच्या भोव:यात पर्यावरणाची सुरक्षा मात्र भरकटत आहे, हे थांबायला हवं.
या वेळी आपटे म्हणाल्या, प्रत्येक विद्याथ्र्यानी सुदृढ पर्यावरण टिकविण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायला हवी. जर प्रत्येकाने स्वत:च्या पायापुरती जरी जमीन स्वच्छ केली, तरी पूर्ण पृथ्वी स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. या वेळी आपटे यांनी शाळेस सौरऊर्जा पृथ्वीगोल भेट दिला.
या वेळी टेरी पॉलिसी संस्थेच्या निवेदिता, मोहित कलाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिनी तळेले, उपमुख्याध्यापिका सुहासिनी कोंडकर, मोहन राऊत, रमेश खिराड, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)