---
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) आणि ब्राह्मणवाडा (ता. अकोले, जि.अहमदनगर) या दोघांना जोडणारा लागाचा घाट हा पुणे-नगर जिल्ह्याला जोडणारा सर्वांत सोयीचा व जवळचा मार्ग आहे. मात्र, तो अतिशय अरुंद असून खोल दरीमुळे प्रवासासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे या घाटरस्त्याचे रुंदीकरण करावे व रस्ता दोन पदरी करावा त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि नगर-पुणे जिल्ह्यातील अंतर आणखी कमी होईल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘लागाचा घाट’ या घाटरस्त्यावर अर्धा किलोमीटरचा रस्ता अत्यंत जीवघेणा ठरतो आहे. तीव्र उतार, वेडवाकडी वळणे, एका बाजूला कधीही दरड कोसळेल असा उंचच उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला ६० ते ७० फूट खोल दरी. शिवाय रस्ताही एकेरी असल्यामुळे समोरून येणारे वाहन आले की एका वाहनाला डोंगराला घासून गाडी उभी करावी लागते, त्यावेळी दुसरी गाडी पास होईपर्यंत त्यातील प्रवाशी जीव मुठीत धरून बसलेले असतात. जुन्नर तालुक्यातील नागरिक नगरमधील अकोले तालुक्यातील पठारभागातील शेतकरी शेतीमाल या मार्गाने ओतूर जुन्नर, नारायणगाव येथे शेतीमाल विक्रीसाठी आणतात, राज्य परिवहन मंडळाच्या ओतूर, जुन्नर पुणे अशा फेऱ्या सुरू असतात त्यामुळे या घाटातील रस्त्याची वेडीवाकडी वळणे दूर करून सोयीचा करावा व रस्त्याचे दुपदरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अकोले तालुका ग्राहक पंचायतीचे सदस्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते दुष्यंत बनकर, भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.
--
जुन्नर व अकोले तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने शिवनेरी, चावंड या किल्ल्यावर भटकंती करण्यासाठी येणारे पर्यटक, अभ्यासक यांची वर्दळ मोठी असते. अष्टविनायक स्थान आणि अकोले तालुक्यातील अगस्ति ऋषी, भंडारदरा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, निळवंडे धरण, रंधाफाॅल आदी ठिकाणे आहेत, त्यामुळे येथील रस्ता दुरुस्त केला तर पर्यटनाला आणखी चालना मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे.
--
फोटो क्रमांक : ०६ओतूर घाटरस्ता फोटो
सोबत फोटो --लागाच्या घाटातील अवघड वळण रस्ता अरुंद उजव्या बाजूला खोल दरी परंतु आता झाडे वाढली आहे .
060721\06pun_6_06072021_6.jpg
फोटो क्रमांक : ०६ओतूर घाटरस्ता फोटो