पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान दि. २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या. यामध्ये एसटी बसेसचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असून २२ कोटी रुपयांचा महसुल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाकडून बंद पुकारण्यात आला. या काळात काही ठिकाणे मोर्चे, निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याने एसटी बसेसला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये बस थांबवून काचा फोडण्यात आल्याचे प्रकार ठिकठिकाणी घडले. यादरम्यान राज्यभरात दि. २० ते २९ जुलै या दहा दिवसांत ३५३ बसेस फोडण्यात आल्या आहेत. सोमवारी चाकण, सोलापुरसह अन्य भागांतही बसेस जाळण्याात आल्या असून काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सोमवारपर्यंत हा आकडा पावणे चारशेच्या पुढे गेल्याची शक्यता आहे. या घटनांमुळे एसटीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचा २२ कोटी २ लाख १३ हजार ७४९ रुपयांचा महसुल बुडाला आहे. आंदोलनाच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने एसटीकडून सतर्कता घेतली जात आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी किंवा मार्गावर बससेवा बंद करण्याचा निर्णय तातडीने घेतला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या काळात आतापर्यंत एसटीचा २२ कोटी महसुल बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 7:15 PM
मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
ठळक मुद्देकाही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याने एसटी बसेसला लक्ष्यआंदोलनाच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने एसटीकडून सतर्कता