लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी दिवसभरात २४३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ९५० झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८१० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५४९ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद झाली.
दिवसभरात एकूण ३४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ९५३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ४५२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ५४९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार २७८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ६८ हजार ५७९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.