शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मातृपूजन संस्कार सोहळ्यात मुलांनी आईचे पाय धुवून घेतले दर्शन; मातांना अश्रू अनावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 12:50 PM

चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून, हळदीकुंकू पुष्प वाहून दर्शन घेतले

सांगवी (बारामती) :  देशाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियाच्या युगात मुलांवरील संस्कार कमी होऊन ते हरवत चालल्याचे पाहायला मिळतात. परंतु, मातृपूजन संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख होऊन पुन्हा मुलांच्यात ते संस्कार दिसून यावे यासाठी सांगवीच्या मराठी शाळेने मातृपूजन संस्कार सोहळ्याचा उपक्रम राबवत छोटासा प्रयत्न केला. आई-वडिलांनंतर मुलांवर संस्कार गिरवणारे शिक्षक असतात. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी,संस्कार करणारी ती आई असते, मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, तिचे आईपण  तिच्या अपत्याविषयीच्या असीम प्रेमामध्ये सामावलेले असते. 

मुलाला चांगला माणूस म्हणून घडविण्याचे आव्हान आईपुढे कायम आहे. आज समाजाला सर्वाधिक गरज आहे ती सुसंस्कारित पिढीची. आईने मुलावर संस्कार करणे, ही आजवर सहज साध्य होणारी गोष्ट होती. आज मात्र ती गोष्ट हरवत चालली असल्याचे वाटते. मुलांना कशाततरी गुंतवून ठेवणे म्हणजे त्यांना घडविणे नाही. आईने मुलांवर केलेल्या संस्कारांची वीण एवढी घट्ट असायला हवी, की कोणत्याही परिस्थितीत ती तुटता कामा नये.  यासाठीच हा मुलांच्यात संस्कारमय वातावरणात निर्मितीसाठी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत गुरुवार (दि. ६) रोजी "मातृपूजन संस्कार सोहळ्याचे" आयोजन करण्यात आले होते.

लहान मुलं ही संस्कारक्षम असतात त्यांच्यावर केलेले संस्कार चिरकाल टिकतात. ही बाब डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या वतीने या संस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मातृसंस्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर माता पालकांची उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या आवारामध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये जवळपास 200 मातांनी सहभाग घेतला.

चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून ,रूमालाने पुसून हळदीकुंकू पुष्प वाहून दर्शन घेतले. मातांनीही मनोभावे आपल्या लाडक्यांना आशीर्वाद दिले. या भावनिक दृश्याने काही मातांना अश्रू अनावर झाले. यावेळी अनेक मातांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीStudentविद्यार्थीSchoolशाळाcultureसांस्कृतिक