सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचा रस्त्यावरुन गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:04 PM2022-09-26T18:04:59+5:302022-09-26T18:05:06+5:30

सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले

During Supriya Sule's visit to Baramati villagers riot on the streets | सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचा रस्त्यावरुन गोंधळ

सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचा रस्त्यावरुन गोंधळ

Next

डोरलेवाडी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती लोकसभा दौऱ्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील तेरा गावांचा दौरा आयोजित केला होता. याच दौऱ्या दरम्यान डोरलेवाडी गावात ग्रामस्थांशी संवाद साधत असतानाच ग्रामस्थांचा रस्त्यावरून गोंधळ झाला.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत.  एक गट म्हणाला, सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा. तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले. सुप्रिया सुळे आज गाव भेटीच्या दौऱ्यावर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली. आणि पाहता पाहता अनेक जण उठून यामध्ये स्वतःची भूमिका मांडू लागले आणि त्यातून गोंधळाला सुरुवात झाली.  यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर ग्रामस्थांची समजूत घालत यातील नेमका वाद समजून घेतला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान याविषयीचा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी एका एका ग्रामस्थांची बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सर्वांना समजून सांगितले.

आम्ही ऐकायला तयार असताना असा वाद करणे योग्य नाही     

''बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे सुप्रिया सुळे यांचा नियोजित दौरा होता. सुळे या गावकऱ्यांची संवाद साधत असताना गावातील रस्त्याच्या कारणावरून गावकऱ्यांच्या दोन गटात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. चांगल्या कामासाठी आपापसात तुम्ही भांडलात ही चांगली गोष्ट आहे. तुमचं कोणी ऐकत नसेल तर अकाव तांडव करणे योग्य आहे. मात्र आम्ही ऐकायला तयार असताना असा वाद करणे योग्य नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांचे कान टोचले.'' 

Web Title: During Supriya Sule's visit to Baramati villagers riot on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.