एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोना पाॅझिटिव्ह वाढत गेले आहेत.
भोर शहरात काल ३ तर गवडी एक, बाजारवाडी २, नसरापूर काल १० तर आज सारोळा १, नसरापूर ११ आज एकूण १२ तर मागील ५ असे २७ जण कोरोना पाॅझिटिव्ह आहेत.
कोरोना दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिक फारसी काळजी घेताना दिसत नाहीत. दुकानात गाडीत बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. प्रशासन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करत आहेत.
त्यामुळे मास्क न लावता फिरणारे वाढत आहेत. त्यामुळे भोर नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भोर शहरासह ग्रामीण भागातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भोर प्रशासनाकडून विविध उपाययोजना
करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कोरोना दिवसेंदिवस दिवस वाढ होऊ शकते.