पुणे: त्यांची ड्युटी म्हणजे वेळेचे बंधन नाही. जेव्हा कधी समाजातील परिस्थिती चिघळलेली असते तेव्हा तर ते रिकाम्या पोटीच दिवस दिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरापासून दुर कुठेतरी रस्त्यावर उभे असतात. अगदी स्वत:ची क चूक महागात पडू शकते म्हणून ते अक्षरश: डोळ्यात तेल घालून कर्तव्यदक्षता दाखवितात. तसेच काहीसे चित्र गरुवारी (दि.९ आॅगस्ट) पुण्यासह संपूर्ण राज्यात जागोजागी पाहायला मिळाले. बंददरम्यान काही ठिकाणी परिस्थितीने हिंसक वळण घेतले. आणि सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांना सुध्दा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले..घरापासुन लांब असलेल्या व ड्युटीवर डबा न घेवून आलेल्या पोलिसांची देखील दुकाने बंद असल्याने दुपारच्या जेवणाची फारच अडचण झाली. त्यात महिला पोलिसांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागले. पाण्यासाठी घरोघर पायपीट करावी लागली. ताणतणावाखालच्या मानसिकतेत पोटाची मारामार जास्त थकवा देवून गेली. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला काही ठिकाणी हिंसक वळण लागले तर काही स्थळी शांततेत पार पडले. पण सर्वच परिसरात कमी जास्त प्रमाणात आंदोलन कर्त्यांच्या रोषात्मक अतिउत्साहाला पोलिसांना सामोरे जावे लागले. कुठे पोलिसांवर दगडफेकही सुध्दा करण्यात आली. अशा प्रसंगांमुळे रक्षण कर्त्यांच्याच जीव धोक्यात येताना आहे. विशेषत: महिला पोलिसांची कुचंबणा अशा आंदोलना दरम्यान बऱ्याच पोलिसांच्या ड्यूटीच्या वेळा १२ तासांपासून ४८ पर्यंत वाढल्या. त्यामुळे नेहमीच बाहेरच्या खाण्या पिण्यावर अवलंबून असणाऱ्या पोलिसांची गुरवारी पुरती तारांबळ उडाली. बंद दरम्यान महिला पोलिसांची अधिक कुचंबणा झाली. शहरातील कोथरुड, वारजे, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, हडपसर, धायरी, परिसरात मराठा मोर्चाच्या बंदला सकाळपासून प्रतिसाद मिळाला. या परिसरातील दुकाने, मॉल, सार्वजनिक वाहतुक सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीदेखील पाहायला मिळणार नाही.बाहेरुन शिक्षण-नोकरीसाठी आलेल्या तरुण तरुणींचे खाणावळी तसेच सर्वच हॉटेल बंद राहिल्याने जेवणाची अडचण झाली होती.
ताणतणावाखालची कर्तव्य तत्पर ड्युटी आणि रिकामं पोट..... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:07 PM
जेव्हा कधी समाजातील परिस्थिती चिघळलेली असते तेव्हा तर ते रिकाम्या पोटीच दिवस दिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरापासून दुर कुठेतरी रस्त्यावर उभे असतात.
ठळक मुद्दे बऱ्याच पोलिसांच्या ड्यूटीच्या वेळा १२ तासांपासून ४८ पर्यंत वाढल्या