इंदापूर : इंदापूर शहरातील दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहा सांस्कृतिक भवन ते दत्तनगर दोन्ही बाजूंना बाभळीची झाडे व कचरा साठला आहे. ते तात्काळ काढावेत, अशी मागणी दत्तनगर परिसरातील नागरिक व सामजिक कार्यकर्ते राहुल गुंडेकर यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याकडे केली आहे.
इंदापूर शहरात दत्तनगर परिसरामधून हजारो नागरिक दररोज शहरात ये-जा करीत असतात. त्यांना बाबळीची झाडे, तसेच अनेक ठिकाणी कचरा, प्लास्टिक कचरा असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामधून डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरत आहे. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर फवारणी करावी, अशी मागणी राहुल गुंडेकर यांनी केली आहे. तसेच महावितरणच्या वीज वहन करणाऱ्या पोलवर विविध प्रकारच्या वेली वाढल्याने नागरिकांना धोका निर्माण झाली आहे.
फोटो ओळ : इंदापूर शहरात दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेल वाढलेल्या बाभळी व कचरा. २३०९२०२१-बारामती-०४