लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय ‘थिंक टँक’ या कलाविष्कार ऑनलाईन स्पर्धेत पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगअँड टेक्नॉलॉजीचा संघ पहिला आला.
प्रथम क्रमांक संघाच्या सिरील वगेर्सी, सुचिता घाटीकर, यशस्वी शर्मा व अंशुल कुमार या विद्यार्थ्यांनी सॅनिटरी पॅडचे पोर्टेबल व्हेंडिंग अँड डिस्पोजल मशिन ही कल्पना उत्कृष्टपणे सादर केली. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे निधी पुंडीर, सायली सोनावणे व निखिल अग्रवाल हे दुसरे आले. त्यांनी ‘स्मार्ट रश मॅनेजर’ या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधील गदीर्ची अद्ययावत माहिती देणा-या मोबाईल अँपची कल्पना मांडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील २७ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले.
----------------------------------------