पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने खाजगी विकसकांना देण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जात आहे. या ई-लिलाव प्रक्रियेद्वारे माण, बावधन बुद्रूक अशा २ गावांमधील एकूण ४ सुविधा भूखंडाची लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. या भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय वापरासाठी आरक्षित केलेला आहे. त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे या गावांमध्ये शाळा, दवाखाने, क्रीडांगण, व्यायामशाळा, पोस्ट कार्यालय, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे याद्वारे आवाहन पीएमआरडीएच्या करण्यात येत आहे. ई-लिलाव पद्धतीत समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या संकेतस्थळावर निविदाधारक यांच्यासाठी १९ नोव्हेंबरपासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निविदा सादर करण्यास २८ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. निविदेबाबत शंकेचे निरसन करण्यासाठी बैठक २० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता पीएमआरडीए, आकुर्डी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर निविदेची ई-लिलाव प्रक्रिया ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. कोटउपरोक्त नमूद सुविधा भूखंड अनुज्ञेय वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने दिले जातील. या सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल. ई-लिलावामध्ये सहभागी होण्यास नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए
पीएमआरडीएकडून माण, बावधनमधील सुविधा भूखंडासाठी ई-लिलाव प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 7:38 PM
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( पीएमआरडीए ) पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले ...
ठळक मुद्देदीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने खाजगी विकसकांना देणार