पुणे : शहरात प्रथमच धावणाऱ्या ई - बस आपल्याच प्रभागातून धावाव्यात यासाठी नगरसेवकांनी सेटिंग केले आहे. पीएमपी प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे. मार्गनिश्चिती करताना जास्तीत जास्त नगरसेवकांच्या वॉडार्तून बस धावेल, असा प्रयत्न करण्यात आला आहे.पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रयत्न म्हणून पुणे शहरात ई- बसचा प्रयोग राबविण्यात येत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ई - बसेस दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून दोन्ही शहरातील मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. दोन्ही शहरासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कामही पूर्ण झाले आहे.राज्यात सर्वाधिक ई- बस पुण्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मागणीही जास्त आहे. येत्या काही महिन्यांत निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याच प्रभागातून ई-बस धावाव्यात, यासाठी नगरसेवक प्रयत्नशीलआहेत. पीएमपी प्रशासनानेही याचा विचार करीत शहराच्या विविध भागांतील चार मार्ग निश्चित केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचाही विचार यामध्ये करण्यात आला आहे. यासाठी वेगवेगळे तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.>नव्या ३३ तेजस्विनी येणारगेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या तेजस्विनी बसेसही दाखल होण्याची शक्यता आहे. ३३ पैकी किमान एका तेजस्विनी बसचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.>...या मार्गावर धावणार ई-बस>पिंपरी शहरडांगे चौक ते हिंजवडी चौक (६ बसेस)मनपाभवन ते आकुर्डीरेल्वे स्टेशन(२ बसेस)भोसरी ते निगडी(२ बसेस)>पुणे शहरभेकराईनगर ते पिंपळेगुरव (६ बसेस)न. ता.वाडी ते भेकराईनगर (३ बसेस)भेकराईनगर ते पुणे स्टेशन (३ बसेस)हडपसर ते हिंजवडी (३ बसेस)>इलेक्ट्रिक बससाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. येत्या तीन - चार दिवसांत शहरात बस दाखल होतील. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.- सिद्धार्थ शिरोळे, संचालक, पीएमपी
ई-बस धावणार माननीयांच्याच वॉर्डातून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:35 AM