शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

ई-बस नवीन वर्षात धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:47 AM

आठवडाभरात निविदा प्रक्रिया सुरू होणार

पुणे : इलेक्ट्रिक वातानुकूलित बस घेण्याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील आठवडाभरात ई-बससाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन नवीन वर्षात पुणेकरांना ई-बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.केंद्र तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार विविध शहरांमधील पर्यावरणाचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन सार्वजनिक सेवेत ई-बसला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी पीएमपीच्या ताफ्यात ई-बस आणण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळाने ५०० बस घेण्याला संमती दिली. त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम भोसरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) या संस्थेला देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ही संस्था पीएमपीची सल्लागार म्हणून काम पाहत आहे. या संस्थेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी संचालक मंडळातील सदस्यांसमोर आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण केले. त्यावर झालेल्या चर्चेनंतर ‘सीआयआरटी’ला अंतिम आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुढील आठवडाभरात हा आराखडा तयार होऊन त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यावर चर्चा झाली. या बैठकीला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे पालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, ममता गायकवाड, नगरसेवक व संचालक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीमध्ये केवळ ई-बस घेण्याबाबत चर्चा झाली. सीआयआरटीच्या प्रतिनिधींनी त्यावर सादरीकरण केले. त्यानंतर बसची एकूण किंमत, कराराचा कालावधी, पायाभूत सुविधा यांसह विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. एकूण ५०० बस घेण्यावर संचालक मंडळाने यापूर्वीच होकार दिला आहे. सीआयआरटीने प्राथमिक आराखडा केला असून, आठवडाभरात अंतिम अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आराखडा आल्यानंतर लगेचच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. एकूण ५०० बसेसची निविदा एकाच वेळी प्रसिद्ध केली जाईल. परंतु, त्यानंतर १५० व ३५० अशा दोन टप्प्यांत प्रत्यक्ष बस ताफ्यात दाखल होतील. ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत चालेल. त्यानंतर जानेवारी महिन्यात किमान २५ बस मार्गावर धावतील, अशापध्दतीने नियोजन केले जाईल.बस वातानुकूलितच असतीलवातानुकूलित बस परवडणार नाहीत, ही चर्चा चुकीची आहे. डिझेल वातानुकूलित बस व ई-बसच्या खर्चामध्ये मोठी तफावत आहे. ई-बससाठी जास्तीत जास्त ५० रुपये प्रति किलोमीटर भाडे देण्याचे प्रस्तावित आहे. सध्या सीएनजीच्या नॉन एसी बससाठी आपण ५० ते ५२ रुपये मोजत आहोत. तसेच ई-बसचे भाडे आणखी कमी करण्याबाबतही प्रयत्न केला जात आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरण