शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

Double Decker Bus: पुणेकरांसाठी लवकरच धावणार इ- डबलडेकर बस; प्रति किलोमीटरला ६ रुपये

By भाग्यश्री गिलडा | Published: July 24, 2024 4:20 PM

‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार पुणे शहरासाठी २० डबल डेकर बसेसला मंजुरी देण्यात आली

पुणे : पुणेकरांचा प्रवास आणखी सुलभ आणि सोयीचा करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 'डबल डेकर' बसेस दाखल होणार आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार पुणे शहरासाठी २० डबल डेकर बसेसला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली. ही बस इलेक्ट्रिक व वातानुकूलित असल्याने पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी डिसेंबर २०२२ मध्ये 'डबलडेकर' बस खरेदीचा निर्णय घेतला. त्याला संचालक मंडळाची मंजुरी देखील मिळाली होती. आता पीएमपी प्रशासनाकडून पुढील आठवड्यापासून याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. मात्र बस खरेदीचा निर्णय ते खरेदीची निविदा प्रक्रिया यासाठीच दीड वर्ष लोटला. बस प्रत्यक्षात धावण्यासाठीदेखील किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कशी असेल नवी डबलडेकर बस ?

- पूर्वीच्या डबल डेकर बसला केवळ एकच जिना होता. नव्या बसला दोन जिने असणार आहेत. तसेच नवीन डबल डेकर बस ही इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असेल.- बसमध्ये अधिक चांगल्या प्रतीच्या सस्पेन्शनच्या वापरामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक होणार आहे. यासोबतच नव्या बसेसमध्ये डिजिटल तिकिट काढता येणार आहे. नव्या बसचा लुक लंडनमध्ये धावणाऱ्या डबलडेकर बससारखा असणार आहे.- डबल डेकर बसमध्ये प्रवासी क्षमता ही सीटिंग ७० पर्यंत असेल तर उभे राहून ४० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.- या डबल डेकर बसची किंमत २ कोटी रुपये असून उंची १४ फूट ४ इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर होणार नाही. पूर्वी 'पीएमपी'च्या ताफ्यात 'एसएलएफ' प्रकारची डबल डेकर बस होती. त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च जास्त होता. नवी बस इलेक्ट्रिक असल्याने त्याच्या देखभालीचा खर्च अत्यल्प असणार आहे.

प्रति किमीसाठी सहा रुपये

'इलेक्ट्रिक बस'साठी प्रति एक किलोमीटर धावण्यासाठी ६ रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रति किमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी 'पीएमपी' प्रशासन बँकेकडून कर्ज घेणार असल्याचे कळते आहे. शिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडून आर्थिक साहाय्यदेखील घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ई-बसच्या यशानंतर ई-डबर डेकर

२०१८ साली पीएमपीएमएलच्या ताफ्यात पहिली ई-बस धावली होती. या वातानुकूलित ई-बसला चांगला प्रतिसाद मिळून रोज लाखो पुणेकर या बसेसमधून प्रवास करतात. त्यानुसार चार्जिंग स्टेशनचीही संख्या वाढवण्यात आली आहे. आता डबल वाहतूक क्षमतेसाठी 'पीएमपीएमएल'च्या ताफ्यात डबल डेकर बसचे संचलन होणार आहे.

पुण्यामध्ये आयटी कंपन्या असल्याने पुणे व पिंपरी- चिंचवड शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाने हा प्रस्ताव मांडला होता. येत्या काळात आणखी इलेक्ट्रिक तसेच सीएनजी बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणून शहरातील नागरिकांनी स्वतःच्या दोन आणि चारचाकी वाहनांचा वापर करू नये हा महामंडळाचा उद्देश आहे. पीएमपीने स्वमालकीच्या २० डबलडेकर बस घेण्याचा निर्णय घेतला आहे.- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीticketतिकिटtourismपर्यटनMONEYपैसा