पुणे : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशाने वेळोवेळी विविध बदल एसटी प्रशासनातर्फे केले जातात. यासोबतच प्रदुषण नियंत्रणासाठी देखील एसटी प्रशासनाकडून विविध मार्गांवर ई बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी स्वारगेट ते कोल्हापूर या मार्गावर ई शिवाई बसला सुरूवात करण्यात आली. पुणे विभागातून ४ बसेस आणि कोल्हापूर विभागातून ४ अशा ८ बसेस या मार्गावर दररोज धावणार आहेत.
याआधी पुण्यातून पुणे ते नाशिक मार्गावर १८, पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर १० ई शिवाई बसेस धावत आहेत. शुक्रवारपासून यामध्ये पुणे ते कोल्हापूर मार्गावर ८ ई शिवाई धावण्यास सुरूवात झाली आहे.पुणे ते कोल्हापूर ई शिवाई बसेसच्या वेळा...१) स्वारगेट ते कोल्हापूरसकाळी ०५:००, ०५:३०, ०६:३०, ०९:००, ०९:३०, १०:३०, दुपारी ०१:३०, ०२:३०, ०३:३० आणि संध्याकाळी ०७:३०२) कोल्हापूर ते स्वारगेटसकाळी ०५:००, ०५:३०, ०६:३०, ०९:००, ९:३०, १०:३०, दुपारी ०१:३०, ०२:३०, ०३:३० आणि संध्याकाळी ०७:३०