चंदननगर : खराडी आयटी पार्क परिसरातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा इआॅन ज्ञानांकुर शाळेने केलेली वाढीव फी मागे घेत पालकांना दिलासा दिला.खराडी झेन्सार आयटी पार्क समोरील इआॅन ज्ञानांकुर शाळेने आचानक या वर्षी शालेय फीवाढ केल्यामुळे शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाद होते़ शुल्कवाढ केल्याच्या विरोधात रविवारी पालकांनी आंदोलन केले. ही शुल्कवाढ पालक-शिक्षक संघाची मान्यता नसताना करण्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. महापॅरेंट्स संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेने वार्षिक शुल्कामध्ये तब्बल १३० टक्के वाढ केली आहे. पालकांना विश्वासात न घेता ही वाढ करण्यात आली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून शुल्कवाढ व इतर मुद्देही वेळोवेळी शाळा व प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा दावा शाळेतील पालक संघटनेने केला आहे. शिक्षण मंडळाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत पालकांनी महापॅरेंट्स संघटनेच्या सहकार्याने रविवारी एकत्र येऊन शाळेत आंदोलन केले. (प्रतिनिधी)मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी पालकांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. चर्चेदरम्यान त्यांनी सध्याची शुल्कवाढ कमी करणे, तसेच पुढील दोन वर्षे शुल्कवाढ न करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महापॅरेंट्स संघटनेचे दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी दिली. या वेळी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापू पठारे, महापॅरेंट्सचे अजय साठे, दत्तात्रय पवार आदी उपस्थित होते. याबाबत येत्या शनिवारी पालकांची बैठक बोलाविण्यात आली आहे़ पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, सातवी ते दहावी अशा ३ वेग-वेगळ्या टप्प्यांत ही फी-वाढ करण्यात आली होती. ती मागे घेण्यात आली असून, पालकांना दिलास मिळाला आहे.- जगदीश मुळीक, आमदार
इआॅन ज्ञानांकुर शाळेने घेतली फीवाढ मागे
By admin | Published: April 10, 2017 2:56 AM