हालचालींच्या पद्धती विकसित करणे
सुधारीत हालचालींचे नमुने :
मानवाचे शरीर हे हालचाल करण्यासाठी बनविले गेले आहे. त्यामुळे कार्यात्मक किंवा क्रियाशील प्रशिक्षण हे स्नायूंच्या कृतींवर नाही तर हालचालींच्या विविध पद्धतींवर अवलंबून आहे.
हालचालींची वाढलेली क्षमता
क्रीडापटूंना स्पर्धेत अधिक कार्यक्षमतेने खेळावे लागते. त्यासाठी अनेक प्रशिक्षक त्यांचे व्यायामाचे नियोजन विशिष्ट पद्धतीने करतात. हे नियोजन करत असताना त्याचा केंद्रबिंदू हा हालचालींच्या विविध पद्धतीच असतो. यामुळे क्रीडापटूंना त्यांची हालचालीची क्षमता वाढवण्यास मदत होते.
विकसित शरीर
कार्यात्मक प्रशिक्षणामुळे शरीराच्या प्रत्येक भागाची अथवा अवयवांची हालचाल होत असते. त्यामुळे असे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींचे शरीर नेहमीच विकसित झालेले पाहायला मिळते.
विकसित झालेला समन्वय आणि गतिशीलता:
या प्रशिक्षणामुळे शरीराची गतिशीलता सुधारते त्याचबरोबर शरीराचा आाणि स्नायूंचा समन्वयदेखील वाढलेला पाहायला मिळतो. यामुळे इजा होण्याचा धोका कमी होतो.
वाढलेली कॅलरी बर्न
अनेकवेळा आपण कॅलरी बर्न करण्यासाठी विविध उपाय करत असतो. मात्र, अपेक्षित असे यश मिळत नाही किंवा अपेक्षित तेवढ्या कॅलरीज बर्न झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे पारंपरिक प्रशिक्षणाच्या तुलनेत कार्यात्मक प्रशिक्षणात अधिक कॅलरी जळते.
विकसित एरोबिक क्षमता :
अलीकडे शरीराची जास्तीत जास्त हालचाल होण्यासाठी कार्डिओचा वापर केला जातो. यामुळे एरोबिक क्षमता सुधारते.
शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग मजबूत होणे:
शरीरातील काही महत्त्वाच्या भागांचा विकास अधिक भक्कम किंवा मजबूत होणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपली स्थिरता वाढते. त्याचबरोबर आपल्या अवयवांचे आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेचे संरक्षण होते, मागच्या स्नायूंना बळकटी मिळते, जखमाही बऱ्या होतात. महत्त्वाचे म्हणजे आपले शरीराची ठेवण सुधारते.
मन नेहमी आनंदीत राहते
आपल्या शरीरावर पूर्णपणे अवलंबून असणारे व्यायाम केल्यास आपणाला कसे वाटते हे सांगण्याची कोणालाही गरज नाही. कारण कार्यात्मक प्रशिक्षणामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होत असते. गतिमान आणि स्थिरता आपल्या शरीराला प्राप्त होते. त्यामुळे मनही नेहमी आनंदीत राहते हे आपल्या शरीराच्या झालेल्या विकासावरून दिसत असते.
एकूणच कार्यात्मक प्रशिक्षणामुळे संपूर्ण शरीराच्या हालचाली होऊन शरीर तंदुरुस्त होते.