पुणे : वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला ज्ञेयाचे आमिष दाखवून दोघं तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगडरोड आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. २८) तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
पहिल्या घटनेमध्ये धायरी परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ गजानन रानडे (वय- ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. टास्क पूर्ण केल्यास जास्त मोबदला देऊ असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांच्याकडून एकूण ६ लाख ३१ हजार रुपये उकळले.
दुसऱ्या घटनेमध्ये लोणीकंद परिसरात राहणाऱ्या योगेशकुमार अमरसिंग राठोड (वय- ३४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार यांना घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास भाग पाडले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यानंतर त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही मोबदला न देता त्यांची फसवणूक केली.