थेऊर - पूर्व हवेलीमध्ये असणाऱ्या डोंगरांवर अनधिकृत करण्यात आलेले प्लॉटिंग तसेच बांधकामाच्या कामासाठी लागणारी खडी आणि मुरमामुळे मोठ्या प्रमाणात लचकेतोड होत आहे. प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. मुरूम तसेच खडीच्या अवैध उपश्यामुळे शासनाच्या कोट्यवधींचा महसूलही बुडत आहे. या प्रकारामुळे पूर्व हवेलीतील सर्व टेकड्या धोक्यात आल्या आहेत.पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात छोट्या टेकड्या तसेच डोंगर आहेत. या परिसराचे गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने नागरीकरण होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात या डोंगरांवर अतिक्रमण करून प्लॉटिंग केले जात आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. मोठमोठ्या इमारतींसाठी लागणारी खडी तसेच मुरूम मिळविण्यासाठी माफियांनी या टेकड्या फोडण्याचे सत्र सुरू केले आहे. शासनाच्या अनेक निर्णयांना हे माफिया बगल देत असून, दिवसाढवळ्या या डोंगरावर जेसीबी फिरवून मुरूम व खडी काढली जात आहे. या मुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे. या परिसरात वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात केली आहे. यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाणही वाढले आहे.नियमबाह्य नोंदी-प्लॉटिंगसंदर्भात अनेक नियम व अटी असूनदेखील हे प्रकार सर्वच ठिकाणी सुरू आहे. नियमबाह्य नोंदीही मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.-मुरूम उपसा करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी असणे गरजेचे आहे. मात्र, ही परवानगी न घेताच डोंगरफोड केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा महसूल बुडत आहे.-या अवैध डोंगरफोडीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
पूर्व हवेलीतील डोंगरांची लचकेतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:52 AM