सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात इको टुरिझम सेंटर लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. अभयारण्य सुमारे ५१४ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. या ठिकाणी चिंकारा जातीची हरणे जास्त प्रमाणात आढळून येतात. त्याखालोखाल ससा, लांडगा, कोल्हा, खोकड, तरस, रानमासा, मुंगूस आदी वन्यप्राण्यांबरोबर गरुड, शिक्रा, कापशी घार, मोर, तितर, लाव्हा, सुगरण, घोरपड, तसेच वेगवेगळ्या जातीचे साप येथे आहेत.अभयारण्यातील वन्यप्राण्यांचा अभ्यास पर्यटकांना घेता यावा, यासाठी इको टुरिझम सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी निधी आला असल्याने लवकरच कामे मार्गी लागणार आहे. यातून टाकाऊंपासून टिकाऊ वस्तू बनविण्यात येणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुक्कामाची व्यवस्था व्हावी, यासाठी सध्या दोन टॅट हाऊस आहेत. आनखी दोन हाऊस तयार करण्यात येणार आहेत. तसेच पुण्यातील एका शासकीय कंपनीला सोलर व पवनऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी १० लाखांचा निधी दिल्याची माहिती वनपाल समीर इंगळे यांनी दिली. त्यानंतर पर्यटकांसाठी हे अभयारण्य खुले होणार आहे. (वार्ताहर)
मयूरेश्वर अभयारण्यात लवकरच ‘इको टुरिझम सेंटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 1:20 AM