सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : महापालिकेच्या बहुचर्चित २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करावी लागणार आहे. सध्या शहरहात जोरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात जलवाहिन्यांसाठी पुन्हा रस्ते खोदाई सुरू केल्यास संपूर्ण शहरात वाहतुक कोंडीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
जलवाहिन्यांचे पहिल्या टप्प्यातील सुमारे २५० किलोमीटरचे काम पूर्ण होण्यासाठी किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूककोंडी होऊन नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या धास्तीने सत्ताधारी रस्ते खोदाईला परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु याचा फार मोठा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या मेट्रोसाठी खोदाई सुरू असून, अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात जर या योजनेसाठी रस्ते खोदाईला मंजुरी दिली, तर मात्र शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही योजना लटकलेलीच आहे.तब्बल १६०० किलोमीटरहून अधिक खोदाई करावी लागणार1 शहरासाठी २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी संपूर्ण शहरात जलवाहिन्या टाकण्यासाठी तब्बल १६०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रमाणात रस्ते खोदाई करावी लागणार आहे.2यामध्ये पहिल्या टप्प्यात तातडीने २५० किलोमीटर रस्ते खोदाई करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने पथविभागाला दिला आहे.धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणारकिलोमीटरपेक्षा अधिक शहरामधील रस्ते खोदाई करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. यामुळे पथविभागाकडून हा प्रस्ताव आयुक्त आणि पक्षनेत्यांकडे पाठवला आहे. पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी अधिक रुंदीचे रस्ते खोदावे लागणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणते रस्ते घ्यायचे, येथील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, एकाच वेळी शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाईचा निर्णय घेतल्यास शहरात वाहतूककोंडीचा पुरता बोजवारा उडणार आहे. त्यामुळे सध्या २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी देण्यास सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. परंतु आता परवानगी दिली नाही तर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून हाती घेतलेली महत्त्वाकांक्षी योजना रखडण्याची भीती व्यक्त होत असून, शहराला मोठा फटका बसू शकतो.दर वर्षी पाणीपट्टीत 15% वाढकर्जरोख्यांवर १५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंडशहराच्या महत्वाकांक्षी समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजनेसाठी पुणे महापालिकेला वर्षभरात १५ कोटी रुपये व्याजापोटी भरावे लागले आहेत़ योजनेचे काहीच काम झाले नसल्याने नाहक व्याज भरावे लागत आहे़ तीन हजार कोटींच्या या योजनेसाठी जून २०१७ मध्ये २ हजार २६४ कोटी रुपये कर्जाने उभारण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने जून २०१७ मध्ये परवानगी दिली होती़शहरामध्ये २४ बाय ७ समान पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २४०० कोटी रुपयांचे कर्ज काढून योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पुणेकरांकडून पाणीपट्टीदेखील वाढवून घेतली जात आहे. परंतु आता रस्ते खोदाईसाठी परवानगी देताना शहरात होणारी वाहतूककोंडी, त्यावर तोडगा, योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत कोणतेही नियोजन सत्ताधाºयांकडे नाही. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरावर ओढवलेल्या पाणीकपातीसह सर्वच कामांचा बोजवारा उडाला आहे. - दिलीप बराटे, विरोधीपक्ष नेते, महापालिका