शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
5
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 स्‍टॉक...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
6
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
7
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
9
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
10
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
11
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
12
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
13
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
14
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
15
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
16
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
17
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
18
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
19
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
20
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

माजी मंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:49 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील दिलीप वळसे पाटील यांनी मोठं भाष्य केले आहे. 

पुणे: माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी(दि.२५) ईडीने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या देशमुखांवरील कारवाईवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री  अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील मोठं भाष्य केले आहे. 

पुण्यात दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्राशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य करताना वळसे पाटील म्हणाले, याबाबत जास्त बोलू इच्छित नाही, संबंधित यंत्रणा तपास करत आहे. तसेच भाजपने त्याच्या कार्यकरणीत काय ठरवायचं हा त्यांचा प्रश्न आहे.मुळात आज राज्यामध्ये कोरोनासारखे विषय आहेत,सामजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक प्रश्न आहेत.

त्यामुळे भाजपकडून चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. कोणी मागणी केली म्हणून लगेच उद्या तसे होईल असं नाही. पण राज्यात सीबीआयला चौकशीला यायचं असेल तर राज्य सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे असेही  वळसे पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस