शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानावर दुसऱ्यांदा ईडीची कारवाई सुरू असून चार वर्षांत ईडीची ही दुसरी कारवाई होत आहे.
पुण्यातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांत कारवाई सुरू असून कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत तर हडपसर येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल आणि सोबत पुतणे आहेत. मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तर विधानसभा निवडणुकीबाबत ते चाचपणी करत होते.