DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:23 AM2024-08-21T10:23:45+5:302024-08-21T10:35:10+5:30

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता.

ED raids at residences of Mangaldas Bandal; was taken into custody | DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

 पुणे: जिल्हा परिषदेचे  माजी सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय पैलवान मंगलदास बांदल यांना मंगळवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आहे. त्यांच्या दोन्ही निवासस्थानांवर ईडीने धाड टाकली होती. त्यामध्ये साडेपाच कोटींची रक्कम मिळून आल्याचे समजते.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती 

मंगळवारी सकाळी 7 वाजता बांदल यांच्या शिक्रापूर आणि महमंदवाडी (ता हवेली) येथील 
निवासस्थानावर ईडीने धाड टाकली. बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल
तसेच भाऊ हे शिक्रापूर येथील  निवासस्थानी होते  तर महमंदवाडी येथील निवासस्थानी मंगलदास बांदल आणि पुतणे होते . रात्री 11.30 वाजेपर्यंत ईडीची कारवाई सुरु होती. यावेळी साडेपाच कोटींची रक्कम आणि कोट्यावधीची मनगटी घड्याळये मिळून आल्याचे समजते. यामध्ये रोलेक्स कंपनीच्या घड्याळाचा समावेश असल्याचे  समजते. 16 ते 17 तासांच्या चौकशीनंतर  बांदल यांना ईडीने रात्रीच ताब्यात घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.

Web Title: ED raids at residences of Mangaldas Bandal; was taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.