शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:23 AM

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता.

 पुणे: जिल्हा परिषदेचे  माजी सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय पैलवान मंगलदास बांदल यांना मंगळवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आहे. त्यांच्या दोन्ही निवासस्थानांवर ईडीने धाड टाकली होती. त्यामध्ये साडेपाच कोटींची रक्कम मिळून आल्याचे समजते.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती 

मंगळवारी सकाळी 7 वाजता बांदल यांच्या शिक्रापूर आणि महमंदवाडी (ता हवेली) येथील निवासस्थानावर ईडीने धाड टाकली. बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदलतसेच भाऊ हे शिक्रापूर येथील  निवासस्थानी होते  तर महमंदवाडी येथील निवासस्थानी मंगलदास बांदल आणि पुतणे होते . रात्री 11.30 वाजेपर्यंत ईडीची कारवाई सुरु होती. यावेळी साडेपाच कोटींची रक्कम आणि कोट्यावधीची मनगटी घड्याळये मिळून आल्याचे समजते. यामध्ये रोलेक्स कंपनीच्या घड्याळाचा समावेश असल्याचे  समजते. 16 ते 17 तासांच्या चौकशीनंतर  बांदल यांना ईडीने रात्रीच ताब्यात घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAjit Pawarअजित पवार