पुणे : सोयाबीन आणि सरकीच्या तेलाचे भाव कमी झाले होते ते पुन्हा वाढणार आहेत. मात्र, उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे स्वस्त झाले म्हणून तेल अधिक खाणेदेखील या दिवसांत आरोग्याला अपायकारक आहे. आपली पचनशक्ती काही प्रमाणात मंदावते तसेच डिहायड्रेशन वाढते. तहान-तहान होते आणि भूकही कमी होते तसेच उन्हामुळे पित्ताचा त्रासही वाढतो, अशा वेळेस जास्त तेलकट खाल्ल्याने ते पचत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत तेल कमी खाल्लेलेच बरे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
तेलाचे भाव
तेल प्रकार-२७ जानेवारी-२७ फेब्रुवारी-२७ मार्च
करडई-१५२ ते १८२ रुपये-१७७ ते २१० रुपये-१८० ते २२०
सोयाबीन-१२२ ते १५२ रुपये-१४७ ते १७७ रुपये-१५८ ते १८८
शेंगदाणा-१३२ ते १७२ रुपये-१५७ ते १९७ रुपये-१६५ ते २१०
सूर्यफूल-१३२ ते १६२ रुपये-१५७ ते १८७ रुपये-१६५ ते २१०
पामतेल-११७ ते १४७ रुपये-१४२ ते १७२ रुपये-१४० ते १७०
सोयाबीनला सर्वाधिक मागणी
ब्राझील, दक्षिण अमेरिका या देशांत सोयाबीनचे उत्पादन घटल्याने सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला आहे तसेच चीन, इराण या देशाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आता रशिया-युक्रेन युद्धामुळे आणखी बिकट परिस्थिती बनली आहे.
दर आणखी वाढण्याची शक्यता ?
वर्ष अखेरीमुळे (मार्च एण्डमुळे) तेलाच्या १५ किलोच्या प्रतिडब्ब्यामागे २५ ते ३० रुपये वाढले होते. मात्र, ते केवळ काही दिवसांसाठी दर कमी झाले होते. मात्र, आता हेच दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
- कन्हैयालाल गुजराती, तेलाचे व्यापारी
उन्हाळ्यात तेल कमी खाल्लेलेच बरे
उकाडा वाढला किमयामध्ये आपली पचनशक्ती थोडीशी मंदावते डिहायड्रेशन वाढते. तहान-तहान होते आणि भूकही कमी होते तसेच उन्हामुळे पित्ताचा त्रासही वाढतो, अशा वेळेस जास्त तेलकट खाल्ल्याने ते पचत नाही. त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणूनच जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ