पुणे - महापालिका शिक्षण मंडळात रोजंदारी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाºयांवर सलग अनेक वर्षे काम करूनही नोकरी जाण्याची, वेतनात कपात होण्याची टांगती तलवार कायम आहे. शिपाई व रखवालदार म्हणून काम करणाºया या कर्मचाºयांना वेठबिगारासारखे काम कारावे लागत असून सुट्यांचे वेतनही त्यांना दिले जात नाही.शिक्षण विभागाकडे गेली १० वर्षांपासून शिपाई व रखवालदार अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. मराठी माध्यमाच्या १९५, इंग्रजी माध्यमाच्या ५२, उर्दू माध्यमाच्या ३० व कन्नड माध्यमाच्या २, अशा एकूण शाळा २७९ महापालिकेच्या वतीने चालवल्या जातात. या सर्व शाळांमध्ये एकूण रोजंदारी शिपाई १०२ व रोजंदारी रखवालदार २६५ असे ३६७ सेवक आहेत. शिपाई व रखवालदार यांना दर महिन्याला पालिकेकडून १६,८४८ रुपये वेतन मिळते. सरकारी सार्वजनिक व सणाच्या सुट्यांचा तसेच दिवाळीच्या शाळेच्या सुट्टीतील २० दिवस व उन्हाळ्याच्या शाळेच्या सुट्टीतील ३० दिवस वेतन दिले जात नाही.शिक्षण मंडळ समिती अस्तित्वात असताना त्यांनी रोजंदारीवर काम करणाºया शिपाई व रखवालदार यांना नोकरीत कायम करण्याचा प्रस्ताव ८ जुलै २०११ रोजी स्थायी समितीसमोर मांडला. सर्वसाधारण सभेने त्यावर महापालिका आयुक्त, स्थायी समिती यांच्या मान्यतेने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यास मान्यता दिली होती तसेच वेतन अदा करण्यास प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता नाही अशी अटदेखील घालण्यात आली होती. या निर्णयाला अनुषंगून १ जानेवारी २०१२ पासून रोजंदारीवर काम करणाºया शिपाई व रखवालदार यांना कायम वेतनश्रेणी देण्यासाठी अर्थसंकल्पात १६ कोटी रुपयांची तरतूद केली होती.मात्र या सर्व गोष्टी अंदाजपत्रकातच राहिल्या आहेत. पालिका प्रशासन या शिपाई व रखवालदारांकडे लक्षच द्यायला तयार नाही. दि. १४ जुलै २०१७ रोजी सरकारने शिक्षण मंडळाचे विसर्जन केले. सगळा कारभार पालिकेकडे आला तरीही हा निर्णय अद्याप प्रलंबितच आहे.कामगार कायद्यानुसार सलग २४० दिवस भरणाºया कामगारांना सेवेत कायम करणे, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, कायम कामगाराप्रमाणे वैद्यकीय, हक्काची, किरकोळ रजा द्यावी, दिवाळी, मे महिना तसेच सरकारी सुटीच्या काळातील वेतन अदा करावे, कायम सेवकांना देण्यात येतो त्याप्रमाणे विनामूल्य गणवेश देणे आदी मागण्या पालिका कामगार युनियनच्या माध्यमातून शिक्षण विभागातील शिपाई व रखवालदारांनी केल्या आहेत. त्याशिवाय आकृतिबंधाचे कारण देत शैक्षणिक पात्रता असलेल्या सेवकांना पदोन्नती देणेही प्रशासनाने थांबवले आहे. गेल्या १५ वर्षांपासून अनेकांनी आपल्या शैक्षिणिक पात्रतेत कष्टपूर्वक सुधारणा केली, शिक्षण घेतले, पात्र ठरले, मात्र त्यांना पदोन्नती दिली जात नाही.रखवालदारांच्या मागण्यांचे निवेदनया कर्मचाºयांचा महापालिका कामगार युनियनने नुकताच मेळावा घेतला. त्यात अध्यक्ष उदय भट यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. युुुनियनने आतापर्यंत दिलेल्या लढ्याची माहिती या मेळाव्यात कर्मचाºयांना देण्यात आली. कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस शोभा बनसोडे, चिटणीस वैजीनाथ गायकवाड, रोहिणी जाधव, प्रकाश हुरकडली यांनीही कामगारांना कायद्याची माहिती दिली. दीपक दंडेलू यांनी स्वागत केले. ओंकार काळे यांनी सूत्रसंचालन केले. विकास सातव, संतोष गायकवाड, संजू तोडकर, अमोल पडळकर, संकेत दीक्षित आदींनी संयोजन केले. प्रकाश चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. युनियनच्या वतीने महापौर, आयुक्त व पदाधिकारी व अधिकाºयांना शिपाई व रखवालदारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिक्षण विभागातील वेठबिगारी, रोजंदारी कर्मचारी, सुट्यांचे वेतन दिले जात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:22 AM