पुणे : शिक्षणाने जातीव्यवस्था नष्ट करता येते. त्यामुळे बहुजनांनी शिक्षणाचे महत्व ओळखले पाहिजे. उत्सव जल्लोषात करण्यापेक्षा वैचारिक प्रबोधन केले पाहिजे. तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. आम्ही शिवरायांचे वारकरी, आम्हाला काय कोणाची भीती, समाजाच्या उन्नतीसाठी लेखणी घेतली हाती अशी व्याख्या करत शिवजयंतीनिमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन आयोजित प्रकाशन व पुरस्कार समारंभात देशमुख बोलत होते. यावेळी शिवकार्यात योगदान दिल्याबददल प्रा. मा. म. देशमुख यांना ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नाशिकच्या सुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ देण्यात आला. दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी शाल, तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह, ग्रंथ व र. रु. ५०००/- अशा स्वरूपात प्रदान करण्यात आले.देशमुख म्हणाले, की पद, पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागू नका. जे काही करायचे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी करा. समाज तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवेल.डॉ. बाबा आढाव म्हणाले, की भारतीय संविधान हे हत्यार बनले आहे. देशापुढे संविधान टिकविण्याशिवाय पर्याय नाही. विचारांना कृतीचा आकार देण्याचे काम करावे. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैलजा मोळक यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञेश मोळक यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास वडघुले यांनी आभार मानले.
शिक्षणाने जातीयव्यवस्था नष्ट होते : मा. म. देशमुख; शिवजयंतीनिमित्त पुण्यात समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:50 PM
तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले.
ठळक मुद्देमा. म. देशमुख यांचा ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन सन्मानसुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’