शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

‘त्या’ ३५ आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

By admin | Published: July 05, 2017 2:51 AM

घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता ८वी च्या वर्गाला शासनाची मान्यता नसल्याने आदिवासी विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता ८वी च्या वर्गाला शासनाची मान्यता नसल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासी विकास विभागाकडून शासनाकडे योग्यवेळी प्रस्ताव सादर न झाल्याने घोडेगावच्या शाळेचीही अडचण निर्माण झाली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून शिक्षणाच्या मूलभूत हक्क कायद्यांतर्गत या शाळेची श्रेणी वाढ करावी, अशी मागणी विधानसभा सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे. घोडेगाव येथे आदिवासी मुला-मुलींसाठी इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा सन २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली आहे. या शाळेसाठी ३५ कोटी रुपयांची नवीन इमारत तयार झाली असून, या वर्षापासून नवीन इमारतीमध्ये शाळा भरत आहे. आदिवासी मुलांच्या १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी अतिशय भव्यदिव्य व दर्जेदार अशी शाळा घोडेगाव येथे निर्माण झाली आहे. या शाळेमध्ये जवळपास ३५० विद्यार्थी शिक्षण घेत असून, यावर्षी ३५ मुले इयत्ता ७ वीमध्ये उत्तीर्ण होऊन ८वीत गेली. दरवर्षी पुढील वर्गाला शासनाकडून नैसर्गिक श्रेणी वाढ मिळते. या शैक्षणिक वर्षात ८वीचा वर्ग सुरू करण्यासाठी शासनाकडून नैसर्गिक श्रेणी वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्प कार्यालय घोडेगाव अथवा अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे यांच्याकडून शासनाकडे प्रस्ताव वेळेत न गेल्यामुळे याला मंजुरी मिळाली नाही. ८वीच्या वर्गाला मंजुरी न मिळाल्याने या वर्गासाठी लागणारे शिक्षक, शैक्षणिक साहित्य, भोजन साहित्य अशी एकही बाब शासनाकडून मिळू शकत नाही. त्यामुळे यावर्षी ८ वीचा वर्ग अजूनही सुरू करता आलेला नाही. शाळा सुरू होऊन वीस दिवस झाले, मात्र या वर्गात शिकणारी ३५ मुले पुढील शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना हा फटका बसत आहे. राज्यातील ६८ शाळांमध्ये श्रेणी वाढ करून ८ वीचा वर्ग सुरू करण्याचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. आदिवासी भागातील गोरगरीब मुले शिक्षाणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षणाचा मूलभूत हक्क या कायद्यांतर्गत घोडेगावच्या शाळेचा समावेश प्रलंबित प्रस्तावामध्ये करावा व सर्वच शाळांना मान्यता द्यावी अथवा विशेष बाब म्हणून घोडेगावच्या शाळेतील इयत्ता ८ वीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.