- विश्वास मोरे। लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गतिमान प्रशासनासाठी, नागरिकांच्या तक्रारीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सारथी ही प्रणाली सुरू केली. या प्रणालीस येत्या स्वातंत्र्यदिनी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या यशस्वी प्रणालीची राज्यभर अंमलबजावणी होणार आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात गतिमान असणारी सारथी प्रशासनाच्या दुर्लक्षाने थंड पडू लागली आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करून गतिशील करण्याची आवश्यकता आहे. औद्योगिकनगरी जगाच्या नकाशावर अत्यंत सुनियोजितपणे विकसित झालेले शहर होय. महापालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी गतिमान प्रशासनास प्राधान्य दिले होते. प्रशासनास शिस्त लावण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडविता याव्यात, यासाठी सारथी ही आॅनलाइन प्रणाली सुरू केली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून ही प्रणाली कार्यान्वित केली होती. पंधरा आॅगस्ट २०१३ रोजी ही प्रणाली कार्यान्वित केली. डॉ. परदेशी यांचे लक्ष असल्याने सारथीवर दाखल होणाऱ्या तक्रारींचे निवारण केले जात असे. सारथीवर दाखल होणारी तक्रार किती वेळात सोडविली गेली याचा आढावा, आयुक्त स्वत: घेत असत. पुढे हीच प्रणाली अन्य महापालिकांनी आत्मसात केली. पीएमओत परदेशींची बढती झाल्यानंतर अशा प्रकारची प्रणाली देशपातळीवर कशी राबविता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आयुक्तानंतर यंत्रणा ठप्पडॉ. परदेशींची महापालिकेतून बदली झाल्यानंतर सारथीवर सोडविण्यात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होत गेले. राजीव जाधव, दिनेश वाघमारे आणि श्रावण हर्डीकर यांच्या काळातही या प्रणालीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे सुविधा असताना नागरिकांना या सुविधेबाबत विश्वास नसल्याने तक्रारीचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन महापालिका आयुक्त हर्डीकर हे आधुनिक तंत्रज्ञानास महत्त्व देणारे आहेत. त्यांनी ही सारथी पुनरुज्जीवित नव्हे, तर सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. सारथी सक्षम करण्यासाठी प्रशासकीय मानसिकतेबरोबरच नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे.पावणेनऊ लाख लोकांनी दिली भेटगेल्या चार वर्षांत आठ लाख ४५ हजार ६६१ नागरिकांनी सारथीला भेट दिली आहे. महापालिकेचे संकेतस्थळ, आणि वेबलिंकला तीन लाख ८५ हजार ८५५ नागरिकांनी भेट दिली, तर कॉल सेंटरला दोन लाख १५ हजार ४४६, पीडीएफ बूकला एक लाख ३९ हजार ८६५, ई-बूकला ७७ हजार ६८४, मोबाइल अॅपवर १८ हजार ७३६ जणांनी भेट दिली, तर ८०७५ पुस्तक प्रती वितरित झाल्या आहेत.तक्रार निवारण १०० टक्के व्हावेमहापालिकेकडे वेब पोर्टल, एसएमएस, ई मेल, लोकशाही दिन, विभागीय आयुक्त लोकशाही दिन, मंत्रालय लोकशाही दिन, केंद्र तक्रारनिवारण कक्ष, जिल्हा लोकशाही दिन, आयुक्त कार्यालय, सारथी हेल्पलाइन, स्थायी समिती, मोबाइल अॅप आणि सोशल मीडिया अशा विविध माध्यमांद्वारे तक्रारी झाल्या. सारथी हेल्पलाइनवर ६४ हजार १०७ तक्रारीपैकी ६३ हजार २९४ तक्रारी निवारण करण्यात आले, तर ८१३ तक्रारींचे निवारण झाले नाही. ९८.७३ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. मोबाइल अॅप तक्रार निवारणाच्या प्रमाणात होतेय घट वेबपोर्टलवर १६ हजार ७६९ नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यांपैकी १६ हजार ५०९ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण झाले. तर २६० तक्रारींचे निवारण केले नाही. तक्रार निवारणाचे प्रमाण ९८.८६ टक्के आहे. एसएमएसवरील १४४१ तक्रारींपैकी १३४८ तक्रारींचे निवारण करण्यात आले. ९३ तक्रारींचे निवारण झाले नाही. त्यामुळे ९६.६ टक्के तक्रारींचे निवारण केले आहे. अॅपवरील १३९६ पैकी १३३५ तक्रारींचे निवारण झाले आहे. तक्रार निवारणाची टक्केवारी ९५.६३ टक्के आहे. सोशल मीडियावरील ६४३ तक्रारींपैकी ६३८ तक्रारींचे निवारण झाले आहे. तर पाच तक्रारींचे निवारण झाले नाही. तक्रार निवारणाचे प्रमाण ९९.२२ टक्के आहे. तर ई-मेल, लोकशाही दिनानिमित्तच्या तक्रार निवारणाचे प्रमाण १०० टक्के आहे. तर महापालिका आयुक्त कार्यालयाकडे होणाऱ्या १४४५ तक्रारींपैकी ११६३ तक्रारींचे निवारण झाले आहे. २५२ तक्रारींचे निवारण झाले नाही. आयुक्त कार्यालयाच्या तक्रार निवारणाची टक्केवारी ९४.३६ टक्के आहे. वर्षेवेब हिट्सकॉलएकूण२०१३-२०१४१,१८,९२६५७,३४६१,७६,२७२२०१४-२०१५९५,१६०५१,२९३१,४६,४५३२०१५-२०१६९२०८६५२,०७४१,४४,१६०२०१६-२०१६८६८५९५५,५४५१,४२,४०४