शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
3
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
4
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
5
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
6
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
7
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
8
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
9
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
10
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
11
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
12
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
13
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
14
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
15
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
16
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
17
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
18
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
19
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
20
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

एलबीटीची प्रभावी यंत्रणा थंडावली

By admin | Published: June 14, 2014 1:49 AM

स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबवलेल्या प्रभावी यंत्रणेचे अनुकरण ठाणे आणि पुणे महापालिकेने केले. १ एप्रिल २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली

पिंपरी : स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबवलेल्या प्रभावी यंत्रणेचे अनुकरण ठाणे आणि पुणे महापालिकेने केले. १ एप्रिल २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. व्यापारी, उद्योजकांमध्ये जागृती व्हावी, एलबीटीस प्रतिसाद मिळावा यासाठी माहिती पुस्तिका छापल्या, हजारो एसएमएस, ई मेल पाठवले. मेळावे घेतले. व्यापाऱ्यांच्या सूचनांची दखल घेऊन शासनाने एलबीटीचे अनेक अटी, नियम शिथील केले. मात्र एलबीटी रद्दच्या हालचाली सुरू झाल्याने ही यंत्रणा थंडावली आहे.जकातीला पर्याय म्हणुन गतवर्षी राज्य शासनाने महापालिकांच्या हद्दीत एलबीटी लागू करण्याचे आदेश दिले. जकातीपोटी मिळणारे वर्षाकाठीचे १२०० कोटींचे उत्पन्न एलबीटीतून मिळावे,या करिता पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभावी अंमलबजावणीस प्राधान्य दिले. व्यापारी, उद्योजकांनी एलबीटी नोंदणी करावी, यासाठी महापालिकेने मोबाईलवर सुमारे चार लाख एसएमएस पाठवले आहेत. ९ हजार ६३२ व्यापाऱ्यांना ई-मेल केले. तसेच १३३५९ व्यापाऱ्यांना पत्र पाठवून कळविले आहे. असे असताना २९ हजार ३ ६७ व्यापारी, उद्योजकांपा संपर्क साधला. व्हॅट नोंदणी असलेल्यांची संखया २५०२५ इतकी होती. व्हॅटनोंदणी धारकांपैकी १२ हजार ६५३ लोकांनी एलबीटी नोंदणी क्रमांक मिळविले. वेळोवेळी सूचना करूनही दखल न घेणाऱ्यांविरूद्ध धाडसत्र अवलंबले. एलबीटीला पर्याय सूचवला जाणार असल्याने या विभागाचे कामकाज सद्यस्थितीत थंडावले आहे. मे महिना अखेरिस ८६० कोटींचे एलबीटीतून उत्पन्न मिळाले.जाचक अटी शिथीलजाचक आणि प्रक्रिया क्लिष्ट असल्याने एलबीटी आकारणीची प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशी आग्रही मागणी व्यापारी संघटनेने केली. त्यावर मंत्रिमंडळ स्तरावर चर्चा होऊन २५ एप्रिल २०१३ ला काही अटी शिथिल करून सुधारित नियमांची अधिसूचना शासनाने काढली. त्यानंतर आणखी काही अटी शिथिल करण्यात आल्या असून, २० जून २०१३ ला त्याबाबतचा सुधारित अध्यादेश शासनाने काढला आहे. २० लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरातील एलबीटी सवलतीसाठी ही मर्यादा ३ लाख केली. सुधारित अध्यादेशात तर लोकसंख्येची अट काढली असून,५ लाखापर्यंतची उलाढाल असलेले व्यापारी सवलतीस पात्र ठरतील, असा बदल केला. विनानोंदणी व्यवसाय करणाऱ्यांच्या दंडाच्या शिक्षेतही शिथिलता आणली आहे. दहापट दंडाच्या तरतुदीतपाच पट ऐवजी दुप्पट दंड असा बदल सुचविला. एलबीटीभरण्याची प्रत्येक महिन्याची तारिख १० ऐवजी २० तारीख एलबीटी निश्चित केली आहे. (प्रतिनिधी)